संजय गांधी नॅशनल पार्कची शान 'आनंद'चा जगाला अलविदा; कर्करोगानं झालं निधन..

कृष्ण जोशी 
Thursday, 9 July 2020

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दहा वर्षीय आनंद हा बंगाल टायगर प्रजातीचा नर वाघ आज पहाटे मरण पावला.

मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दहा वर्षीय आनंद हा बंगाल टायगर प्रजातीचा नर वाघ आज पहाटे मरण पावला. आनंदचा जन्म संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातीलच होता, तेथील बसंती व पलाश या जोडीचे हे अपत्य होते. त्याला काही महिन्यांपूर्वी एका वेगळ्याच प्रकारच्या कर्करोगाने ग्रासले होते. 

त्यामुळे या मार्चपासून त्याचे वजनही झपाट्याने कमी होत होते. त्यानंतर त्याची मूत्रपिंडेही व्यवस्थित काम करीत नसल्याचे आढळून आले होते. गेले दहा दिवस त्याने काही खालेल्ही नव्हते. मुंबईच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचे डॉक्टर त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन होते. मात्र त्याची तब्येत खालावत गेली व आज पहाटे तो मरण पावला. शवविच्छेदनानंतर नियमानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

हेही वाचा: मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी पोहोचला 'इतक्या' दिवसांवर; वाचा महत्वाची बातमी.. 

सन २०१० मध्ये जन्मलेल्या आनंद वाघाला तोंडाचा कर्करोग झाल्याचे निदर्शनास आले होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकतज्ञ शैलेश पेठे, बैलघोडा रुग्णालयातील पशुवैद्यकतज्ञ तसेच बाहेरील खासगी डॉक्टर आनंदवर उपचार करीत होते. मात्र त्या उपचारांचा फायदा झाला नाही. मार्चपासून तो खंगत चालला व त्याने हळुहळू खाणेही कमी केले, त्यामुळे त्याच्या इतर अवयवांवरही परिणाम झाला. दहा दिवस तर तो काहीच खात नव्हता. 

शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच मृत्युचे नेमके कारण कळेल, सामान्यतः या वाघाला झालेला तोंडाचा कर्करोग अनेक कारणांमुळे होऊ शकतो, असेही डॉ. पेठे यांनी सांगितले. जंगली दुर्मिळ जनावरांच्या अवयवांची चोरी-तस्करी होऊ नये, यासाठी सामान्यतः प्राणीसंग्रहालयातील प्राणी मरण पावल्यावर त्यांना जाळून टाकण्यात येते. क्वचित काही प्राण्यांवर प्रक्रिया करून त्यांना जतन केले जाते.

हेही वाचा: बापरे! शववाहीनीचे दोन महिन्याचे भाडे तब्बल 'इतके' लाख रुपये; वाचा सविस्तर बातमी.

गेल्या वर्षी मोठ्या भावाचे निधन: 

आनंदला झालेला कर्करोग हा अनुवंशिक प्रकारचा होता. मागच्याच वर्षी त्याच्या मोठ्या भावाचेही अशाच प्रकारच्या कॅन्सरने निधन झाले होते. सामान्यतः अशा वाघांचे आयुष्य 14 ते 16 वर्षे असते. आनंद वाघ हा उद्यानातील सफारी विभागात मोकळा फिरत असे. लॉकडाऊन असूनही या वाघावर डॉक्टर पेठे व अन्य पथकाने सर्वोत्तम उपचार केले होते. आता उद्यानात केवळ चार माद्या व  एक नर एवढेच वाघ उरले आहेत.

संपादन: अथर्व महांकाळ 

anand tiger in sanjay gandhi naitional park is no more 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anand tiger in sanjay gandhi naitional park is no more