अंधेरीत 25 श्वानांचे लग्न 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

लग्नापूर्वी डेटिंग केले फेरे घेतले 
मुंबई : लग्नाचा सीझन आहे. त्या सीझनमध्येच देशभरातील सुमारे 25 कुत्र्यांची जोडपी विवाहबंधनात बांधली गेली आहेत. अंधेरी येथे दिवसभर झालेल्या कार्यक्रमात या श्‍वानांचा विवाह झाला आहे. 
"द ऍनिमल पोलिस - ओह माय डॉग' संस्थेचे संचालक संकल्प शर्मा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात नागपूर, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, पुणे, कर्नाटक, दिल्ली या भागांतून श्‍वान आले होते. एकूण 450 श्‍वान यात सहभागी झाले होते. त्यापैकी 360 राज्यभरातून, तर 300 श्‍वान मुंबईतून आले होते. 

या श्‍वानांचा सांभाळ करणाऱ्यांनी निर्णय घेतला आणि दोन श्वानांची लग्ने झाली, असे झाले नाही. 2017 जानेवारीत झालेल्या डेटिंग कार्निव्हलनंतर काही श्वानांनी आपला जोडीदार निवडला. रविवारी ब्राह्मणांच्या साक्षीने फेरे घेऊन ते विवाहबंधनात अडकले. या लग्ना वेळी श्वानांच्या आवडीनिवडी, त्यांचे राहणीमान, त्यांच्या सवयी, शॅम्पू या सर्व बाबींवर ते राहत असलेल्या कुटुंबांमध्ये चर्चा झाली. काही श्वानांच्या कुंडल्या असतात. लग्नांमध्ये मात्र कुंडली पाहण्यात आलेली नाही, असे संकल्प यांनी "सकाळ'ला सांगितले. पुढच्या आठवड्यात या संदर्भातील छोटा रिव्ह्यू घेणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.  

Web Title: Andheri 25 Dogs wedding