अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची घोषणा लवकरच, आशिष शेलार सांभाळणार धुरा

आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व मतदार संघ रिक्त झाला आहे.
Andheri East by-election 2022
Andheri East by-election 2022
Summary

आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व मतदार संघ रिक्त झाला आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची धुरा आशिष शेलार यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व मतदार संघ रिक्त झाला असल्याने लवकरच या मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मतदार सघांची जबाबदारी भाजपाने नेते आशिष शेलार यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या भा्गांत शेलारांचं राजकीय शक्तीप्रदर्शन दिसणार आहे. (Andheri East by-election 2022)

Andheri East by-election 2022
भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू; 'मिशन 48'ची घोषणा

पंढरपूर, कोल्हापूर या पोटनिवडणुकीनंतर आता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर या मतदार संघाची धुरा भाजपाने आशिष शेलार यांच्या खांद्यावर दिली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पू. मतदार संघ रिक्त झाला होता. येत्या काही दिवसांत या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाकडून आढावा घेण्यासाठी शेलारांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये रणनीती कशी आखायची आहे, उमेदवार कोण असले अशी सर्व जबाबदारी शेलारांवर सोपवण्यात आल्याने येथे शिवसेना विरुद्ध भाजप अशी जोरदार लढत पहायला मिळे शकते. याआधीही शेलार यांनी मुबंई महापालिकेसाठी उत्तम कामगिरी बजावली आहे. आता पुन्हा एकदा भाजपाने आशिष शेलार यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे अगामी महापालिका निवडणुकीसाठी ही पोटनिवडणुक म्हणेज सेमी फायनल म्हणून भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पहायला मिळणार आहे.

Andheri East by-election 2022
चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित पवारांच्या अपमानाचा विषयच नाही, कारण...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com