आगीची न्यायालयीन चौकशी करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मुंबई - अंधेरीतील कामगार राज्य विमा योजना रुग्णालयाला लागलेल्या आगीला केंद्र व राज्य सरकार आणि महामंडळाची बेफिकिरी जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रीय मिल मजदूर संघाने केला आहे. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केली आहे.

मुंबईतील गांधी हॉस्पिटलसह अन्य सहा कामगार रुग्णालयांच्या दुरवस्थेकडे राष्ट्रीय मिल मजदूर संघाने वेळोवेळी सरकारचे लक्ष वेधले आहे. निधी देत नसले तरी या रुग्णालयाच्या कारभाराकडे लक्ष देणे ही राज्य सरकारची नैतिक जबाबदारी होती, अशी टीका राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. सरकारने दुर्लक्ष केले असून, आता महामंडळही निधी देत नाही. या पार्श्‍वभूमीवर या आगीबाबत कामगार संशय व्यक्त करत आहे. सरकारने याची दखल घेऊन न्यायालयालयीन चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Andheri Fire Court Inquiry Govindrao Mohite