VIDEO:अंधेरीत बर्निंग कारचा थरारक व्हिडिओ, कार जळून खाक

पूजा विचारे
Sunday, 18 October 2020

मुंबईतल्या अंधेरी भागात एक कारनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. हा बर्निंग कारचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईः मुंबईतल्या अंधेरी भागात एक कारनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. हा बर्निंग कारचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भररस्त्यात या कारचा अग्नितांडव पाहायला मिळाला. भर रस्त्यावर ही आग पाहून नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली आहे. 

आग लागल्याची पाहताच स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. या कारच्या दुर्घटनेत कार चालक थोडक्यात बचावला आहे. कारनं पेट घेतल्याचं दिसताच कार चालक तात्काळ कारच्या बाहेर येण्यात यशस्वी झाला. 

अग्निशमन दलाला आगीची माहिती तातडीनं दिली. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली होती. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली यासंदर्भात अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही.

Andheri Thrilling video of a car burning in the dark burning the car ashes


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andheri Thrilling video of a car burning in the dark burning the car ashes