निदानापूर्वीच औषध देणे बेजबाबदारपणा! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

मुंबई - आजाराचे निदान करण्यापूर्वीच औषधे देणे म्हणजे व्यावसायिक बेजाबदारपणा आहे, असे मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच डॉक्‍टर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. 

मुंबई - आजाराचे निदान करण्यापूर्वीच औषधे देणे म्हणजे व्यावसायिक बेजाबदारपणा आहे, असे मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच डॉक्‍टर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. 

रत्नागिरी जिल्ह्यातील एका महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर तिची प्रकृती बिघडली. त्यावेळेस औषधाच्या दुकानातून गोळ्या घेण्याच्या सूचना या दाम्पत्याने फोनवरन दिल्या होत्या. या महिलेचा नंतर मृत्यू झाला होता.रत्नागिरी पोलिस ठाण्यामध्ये डॉक्‍टर संजीव पावसकर आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर न्या. साधना जाधव यांच्यापुढे नुकतीच सुनावणी झाली. निदान झाल्याशिवाय औषधे देणे आणि प्रिस्क्रिप्शन न देता ती घेण्यास सांगणे गैर आहे, असे मत न्यायालयाने न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळताना व्यक्त केले. 

Web Title: Anesthesia to give the medicine before diagnosis