अनिल अंबानींकडून निधीसाठी चाचपणी

Anil-Ambani
Anil-Ambani

मुंबई - एरिक्‍सन कंपनीच्या ४५३ कोटींच्या थकबाकीवरून सर्वोच्च न्यायालयाने कानउघडणी केल्यानंतर उद्योजक अनिल अंबानी यांनी निधी उभारणीच्या पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. प्राप्तिकर परताव्यापोटी आलेल्या २६० कोटी थेट इरिक्‍सनला देण्याचा निर्णय रिलायन्स कम्युनिकेशनच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. 

अनिल अंबानी यांच्यावर ४६ हजार कोटींचे कर्ज आहे. त्यांच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशनला इरिक्‍सन कंपनीचे ५५० कोटी देणे बाकी आहे. त्यापैकी ११८ कोटी कंपनीने न्यायालयाकडे जमा केले आहेत. उर्वरित ४५३ कोटी अंबानी यांना व्यवस्था करावी लागणार आहे. कंपनीवरील कर्जाचा बोजा वाढत असून, दिवाळखोरीची टांगती तलवार आहे. यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशनच्या मालमत्तांची विक्री केल्यास २५ हजार कोटींचा निधी उभारला जाऊ शकतो, असा प्रस्ताव कंपनीला कर्ज दिलेल्या बॅंकांनी तयार केला आहे. यात अनिल अंबानी यांचे ज्येष्ठ बंधू मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओला स्पेक्‍ट्रम आणि दूरसंपर्क मनोऱ्यांची विक्री करण्याचा करार केला होता. मात्र दूरसंपर्क खात्याने परवानगी नाकारल्याने हा करार पूर्ण झाला नाही, असा दावा अनिल अंबानी यांनी केला होता. न्यायालयाने हा दावा खोडून काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com