esakal | अनिल देशमुखांच्या ED विरोधातील याचिकेवर १२ ऑक्टोबरला सुनावणी
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh

अनिल देशमुखांच्या ED विरोधातील याचिकेवर १२ ऑक्टोबरला सुनावणी

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी प्रवर्तन निर्देशालय, ED विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ईडी तर्फे जारी समन्स रद्द करण्यासाठी अनिल देशमुखांनी ही याचिका दाखल केली आहे.

ईडी तर्फे सुरू असलेल्या कठोर कारवाई पासून दिलासा देण्याची मागणी अनिल देशमुखांनी याचिकेत केली आहे. अनिल देशमुखांतर्फे वरिष्ठ वकील विक्रम चौधरी आणि इंद्रपाल सिंह यांनी युक्तिवाद केला.

हेही वाचा: 'वेलकम बॅक, एअर इंडिया,' रतन टाटांचं खास टि्वट

आज फक्त अनिल देशमुखांच्या वकिलांनी कोर्टाकडे पुढील तारीख मागितली आणि त्याच दिवशी ईडीला सुद्धा त्यांची बाजू मांडण्याची परवानगी देण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 12 ऑक्टोबर रोजी हायकोर्टात होणार आहे

loading image
go to top