
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी विरोधकांचा समाचार घेत मुंबई पोलिसांच्या कामाचे कौतुक केले.
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, तसेच पोलिसांना बदनाम करण्याच्या विडा काही लोकांनी उचलला होता. पण जनतेला माहिती आहे, मुंबई पोलिस व राज्य पोलिस कसे काम करतात, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी विरोधकांचा समाचार घेत मुंबई पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. ते वरळी सीफेस येथील स्वयंचलीत विद्युत स्कुटर्स(सेगवे) प्रमाणालीच्या उद्धाटन प्रसंगी बोलत होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही यावेळी पोलिस व मुंबईकरांचे कौतुक करत पोलिसांच्या उपस्थिती आपल्या सुरक्षीत वातावरण वाटते, असे मत व्यक्त केले.
ED विरोधात शिवसेना आक्रमक; महामुंबईतील शिवसैनिक रस्त्यावर उतरणार
नरीमन पॉईंट पाठोपाठ आता वरळी सीफेस व वांद्रे येथेही सेगवेच्या मदतीने पोलिस गस्त घालणार आहेत. शहरातील इतर भागांमध्येही अपेक्षेनुसार त्यांची तैनाती करण्यात येईल. यावेळी पोलिस आयुक्त परमबीर सिंग व सहपोलिस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) विश्वास नागरे पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी अनिल देखमुख म्हणाले की, सेगवेची सुरूवात आम्ही कोरोनाची सुरूवात होण्यापूर्वी नरीमन पॉईंट येथे केली होती. त्यानंतर आता याची सुरूवात वरळी व वांद्रे येथे होत आहे. त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणीही जेथे पेट्रोलिंगसाठी याचा वापर होऊ शकेल, अशा ठिकाणी त्याची सुरूवात करण्यात येईल. मुंबई पोलिस, राज्य पोलिस आपल्याला कसे अद्ययावत करता येईल. जगभरातील पोलिसांकडून जे अद्ययावर यंत्रे वापरली जातात. त्यांचा मुंबई व राज्य पोलिसांत कसा वापर करता येईल, त्याच्या माध्यमातून आणखी चांगल्या पद्धतीने पोलिसिंग करता येईल. त्या अनुषंगाने आम्ही सुरूवात केली असल्याचे देशमुख यांनी सांगितले. हॉर्स माउंटेट पोलिस पथकही आपण सुरू केले. येणा-या काळात ड्रोनच्या सहाय्याने आपल्याला कशी पोलिसिंग करता येईल, याचाही आमचा अभ्यास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी तसेच राज्य पोलिसांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला चोख सुरक्षा ठेवल्यामुळे कोणताही अप्रिय प्रकार घडला नाही. त्याबद्दल मुंबई पोलिसांचे आभार मानले पाहिजेत.
आदित्य ठाकरे यांनीही यावेळी पोलिसांचे आभार मानत, सगळ्यांचे माझ्या वरळी मतदार संघात स्वागत आहे. येथील वरळी कोळीवाडा कन्टेन्मेंट झोन करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिस व महापालिकेच्या अधिका-यांनी चोख कामगिरी बजावली. त्यामुळे हा परिसर कन्टेन्मेंट झोनच्या बाहेर आहे. मुंबई पोलिसांमुळेच मुंबई सुरक्षीत आहे, असेही यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
अभिनेता अक्षयकडून पोलिसांसाठी विशेष बॅग
आपण सेगवेचा अनेकवेळा वापर केला आहे. वारंवार चालवल्यामुळे पाठ दुखू शकते, त्यामुळे सेगवे चालवणा-या पोलिसांसाठी विशेष मसाजर बॅग देण्याची माझी इच्छा आहे. त्याबद्दल मी अनिल देशमुख व आदित्य ठाकरे यांच्याकडे परवानगी मागतोय.त्यांची परवानगी असेल, तर या बॅगा पोलिसांना देण्याची माझी इच्छा आहे. यावेळी अक्षयने महाराष्ट्र राज्य पोलिस स्थापना दिवसाबद्दल सर्व पोलिसांचे आभार मानले