ऍनिमेटर व दिग्दर्शक भीमसेन खुराना यांचे निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेते ऍनिमेटर आणि घरौंदा चित्रपटाचे दिग्दर्शक भीमसेन खुराना (वय 82) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

भीमसेन खुराना यांची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले होते. मंगळवारी (ता.17) रात्री जुहू येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

भीमसेन खुराना यांचा जन्म 1936 मध्ये पाकिस्तानमधील मुल्तान येथे झाला होता. त्यांनी फाइन आर्टस आणि शास्त्रीय संगीत या विषयांत लखनौ विद्यापीठातून पदवी घेतली होती. 1970 मध्ये "द क्‍लाइम्ब' या ऍनिमेशन लघुपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. या लघुपटाला शिकागो चित्रपट महोत्सवात सिल्व्हर ह्युगो पुरस्कार मिळाला होता. 1974 मधील "एक चिड़िया, अनेक चिड़िया' हे सुप्रसिद्ध गाणे खुराना यांच्या "एक अनेक एकता' या ऍनिमेशन लघुपटातले आहे. त्यांनी अनेक ऍनिमेशनपट, तसेच जाहिराती बनवल्या. "ना', "एक दो', "फायर', "मुन्नी', "फ्रीडम इज ए थिन लाय', "मेहमान', "कहानी हर जमाने की', "बिझनेस इज पीपल' या ऍनिमेशनपटांचा समावेश आहे. त्यांना ऍनिमेशन लघुपटांसाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.
1976 मध्ये त्यांनी "घरौंदा' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यांनी अनेक माहितीपटही बनवले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: animator director bhimsain khurana death