'राज चौकशीला निघालेत की, सत्यनारायणाच्या पूजेला?'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

दमानिया म्हणाल्या, की राज ठाकरे चौकशीला जाताना ड्रामा करत आहेत. ते चौकशीला जात आहेत, की सत्यनारायण पूजेला. राज ठाकरे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. राज ठाकरेंकडे एवढी संपत्ती कोठून आली, याची चौकशी होत आहे. भाजपने त्यांच्या नेत्यांचीही अशी चौकशी केली पाहिजे. सामान्य माणसाप्रमाणे सर्वांची चौकशी झाली पाहिजे. 

मुंबई : दादरच्या कोहिनूर मिलच्या जमीन खरेदी- विक्रीप्रकरणी आज (गुरुवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत की सत्यनारायण पुजेला असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

दमानिया म्हणाल्या, की राज ठाकरे चौकशीला जाताना ड्रामा करत आहेत. ते चौकशीला जात आहेत, की सत्यनारायण पूजेला. राज ठाकरे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. राज ठाकरेंकडे एवढी संपत्ती कोठून आली, याची चौकशी होत आहे. भाजपने त्यांच्या नेत्यांचीही अशी चौकशी केली पाहिजे. सामान्य माणसाप्रमाणे सर्वांची चौकशी झाली पाहिजे. 

दादरच्या कोहिनूर मिलच्या जमीन खरेदी- विक्रीप्रकरणी आज (गुरुवार) राज ठाकरे यांची चौकशी होत असून, यावेळी त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे व मुलगा अमित ठाकरेही ईडीच्या कार्यालयात उपस्थित आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anjali Damania criticizes Raj Thackeray