अंकिता आणि आदिती दांडेकर भगिनींचे यश

ankita-aaditi-dandekar
ankita-aaditi-dandekar

मुंबईच्या अंकिता आणि आदिती अजित दांडेकर भगिनी या दोघी जिम्नॅस्टिक्स मध्ये राष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या आहेत. दोघींनी आपल्या करियरमध्ये सर्वाधिक यशही प्राप्त केले आहे.. त्यांची ही छोटी यशोगाथा इतर मुलींना प्रेरणादायी ठरेल. आज (८ मार्च) जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांनीच करून दिलेली त्यांची ही ओळख...

स्त्री... ह्या दिड शब्दात सर्व जग जिंकून घेण्याची ताकद दडलेली आहे. हे मी लहानपणापासून शिकत आले आहे. आजपर्यंत ज्या स्त्रीया माझ्या आयुष्यात आल्या त्या सर्वांमध्ये देखील मी ही ताकद पाहिली आहे. मग ती माझी आजी असो, माझी आई असो वा माझ्या गुरू असोत. पण ही शक्ती आहे तरी काय. ती कुठून येते.. माझ्यात पण ही आहे का.. असे अनेक प्रश्न नेहमी मला सतावतात. मग विचार करताना मला हे जाणवले की, ही शक्ति प्रत्येक स्त्रीत असते. गरज असते ती फक्त जाणीवपूर्वक तिची जोपासाना करण्याची.

मला जसे माझ्या आजीकडून जिद्दीने पुढे चालत कसे रहावे याचे धडे मिळाले. माझ्या आईने तर बोट धरून मला जग दाखवले आणि योग्यवेळी बोट साडून सज्ञान केले. पुढे माझ्या नृत्याच्या गुरू लता बकाळकर आणि रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या आंतरराष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षिका वर्षा उपाध्ये माझ्या आयुष्यात आल्या. लता ताईंनी मला नृत्यातील बारकावे तर शिकवलेच पण त्यांनी मला प्रेक्षकांसमोर उभे राहण्याचा आत्मविश्वास दिला. वर्षाताईंनी मला रिदमिक जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण कसे द्यावे हे शिकवतानाच एखादया कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन कसे करावे, लोकांशी कसे बोलावे असे अनेक धडे दिले. त्यांनी मला नृत्य आणि खेळाच्या तालमी बरोबरोरच कितीही कठीण प्रसंग आला तरी त्यातून मार्ग काढत शिखर कसे गाठावे हे शिकविले.

मी, जेव्हा मानसशास्त्राचा अभ्यास करू लागले, तसे मला कळू लागले की हे आयुष्यातील सर्व धडे, त्याहूनही जास्त आपल्याला खेळातून शिकायला मिळतात. खेळ आपल्याला कणखर, खंबीर, शिस्तबध्द आणि जिद्दी बनवतो. स्वबळावर विचार करायला शिकवतो. तसेच वेळेचे योग्य नियमन शिकवतो. तसे्च शरीर तंदुरुस्त राहते. खेळाचे असे अनेक फायदे आहेत. खेळ हा आपला मानसिक व सर्वांगिण विकास करण्यास मदत करतो. अधुनिक स्त्रियांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. आजची समस्या कालच्या समस्येपेक्षा वेगळी असू शकते. पण ठराविक वय झाल्यावर सामान्य स्त्रीला असे वाटते की आता मी या वयात काय खेळणार? आता कुठे खेळाय़ला सुरु करणार?

यावर मी उदाहरण देईन दीपा मलिकचे. वयाच्या चाळीसाव्या वर्षी तिने अपंगात्वावर मात करत 2016च्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली. नुसती सहभागी झाली असे नाही तर तिने देशासाठी तीन पदकेही मिळविली. अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. कुठेही असे वाटत नाही की ती अपंग आहे. किंवा तिने आपल्या अपंगात्वाचे भांडवल केले नाही. अशा स्त्रीयांचा अदर्श आपण ठेवायला हवा. खरं तर लहान वयात खेळाची सुरवात करावी असे म्हणतात. जर अशी सुरवात लहान वयात झाली तर त्याचा फायदा तर आहेच. पण म्हणून फक्त लहानपणीच खेळ खेळावा असे नाही. काही खेळ तर असे आहेत की जे आपण कोणत्याही वयात सुरु करू शकतो. कोणताही खेळ हा फक्त स्पर्धेत सहभागी हेण्यासाठी किंवा पदक मिळविण्यासाठीच खेळला पाहिजे असे नाही तर खेळ हे स्वानंदासाठीसुध्दा खेळले गेले पाहिजेत.

स्वानंदातून नंतर आपल्याला शक्ति प्राप्त होते. यातूनच आपण शिकू शकतो की वय, अपंगत्व, परिस्थिती असे कोणतेही अडथळे महत्वाचे नसतात. या सर्व गोष्टींवर जिद्दीने मात करता येते. मनात जिद्द बाळगली आणि एखादी गोष्ट ठरविली तर कोणतेही अडथळे किंवबुना स्त्रीत्वसुध्दा आपल्या व आपल्या धेय्या दरम्यान येऊ शकत नाही.

आदिती अजित दांडेकर
आदिती अजित दांडेकर. वय वर्षे 16 ही अतिशय गुणी आणि होतकरू जिमनॉस्टिक खेळाडू. वयाच्या आठव्या वर्षीपासून तिने ह्या खेळाला दादर (मुंबई) मधून सुरवात केली. गेली आठ वर्ष सातत्याने भरलेल्या अनेक स्पर्धांमधून तिने दोनशेहून जास्त पदके (त्यात सुवर्ण आणि रजत या दोन्ही पदकांचा समावेश आहे) मिळविली आहेत. यंदाची शालेय स्पर्धा तिच्या शालेय जीवनातील शेवटची स्पर्धा होती. त्यातही तिने सहा सुवर्ण पदके मिळवून 2011चे रेकॉर्ड खोडून काढले आहे.

ती पुढील वर्षापासून आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत खेळणार आहे. तिने ही कामगिरी केली त्यात तिचे गुरू वर्षा उपाध्ये (आंतरराष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू) आणि सहाय्यक प्रशिक्षक क्षिप्रा जोशी ह्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले आहे. ती हे प्रशिक्षण भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकूल, धारवी, मुंबई इथे घेत आहे. भविष्यामध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सर्वांगीण यश मिळवून सुवर्णपदक आणण्याचा आणि भारताचे नाव उज्ज्वल करण्याचा आदितीचा निश्चय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com