आचार्य भिसे शिक्षण संस्थेचा वर्धापनदिन साजरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

बोर्डी (पालघर) : तलासरी तालुक्यातील झाई-बोरीगाव ग्रामपंचायत क्षेत्रात गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऱ्या आचार्य भिसे शिक्षण संस्थेचा 36 वा वर्धापनदिन आणि पूज्य शंकर रामचंद्र उर्फ आचार्य भिसे गुरुजिंची 47 वी पुण्यातिथी उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संस्थेचे अध्यक्ष एन.के.पाटील यांचे अध्यक्षतेखाली आणि पालघर जिल्ह्यातील जेष्ठ विधिज्ञ प्रकाशभाई करंदिकर प्रमुख उपस्थितीत पार पडला.

उपाध्यक्ष दिनकर राऊत, कार्यवाह विजय म्हात्रे,खजीनदार श्रीकांत सावे, मुख्याधिपिका दिपा पाटील, कार्यकारी अध्यक्ष भुपेंद्र सावे आदी मान्यवर संस्थेचे शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना, प्रकाश करंदीकर म्हणाले शैक्षणिक क्षेत्रात सेवाभावी काम करणाऱ्या संस्था ग्रामीण भागात टिकल्या तरच गोरगरीब मुलांना शिक्षणाची संधी मिळेल. आचार्य भिसे शिक्षण संस्थेची वाटचाल सेवाभावी मार्गाने होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे औचित्य साधून अविनाश दादोडे, वंदेश जाधव, आतिश कवटे,अनिता जनाथे,वैशाली, केतन हडपती, या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: anniversary of acharya bhise education institute