सानुग्रह अनुदानाचा खेळखंडोबा, बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

file photo
file photo

मुंबई : दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली असतानाही बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानाचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. अनुदानाबाबत अनिश्‍चितता असल्याने सानुग्रह अनुदानाकडे डोळे लावून बसलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. २९ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या बेस्ट समितीच्या बैठकीत त्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

दिवाळीनिमित्त २०१७ मध्ये मिळालेले सानुग्रह अनुदान ५ हजार ५०० रुपये पाच समान हप्त्यात देण्यात आले होते. २०१८ मध्ये जाहीर करूनही सानुग्रह अनुदान देण्यात आलेच नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आशेवर ठेवून त्यांच्या तोंडाला पाने पुसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. २०१९ मध्ये मात्र सानुग्रह अनुदानाची चर्चा आणि निर्णय तत्काळ झाला होता. ५ हजार ५०० रुपये ऐवजी ९ हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले; मात्र दिवाळीदरम्यान विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने सानुग्रह अनुदान आचारसंहितेच्या कचाट्यात अडकले.

आचारसंहिता २७ ऑक्‍टोबर रोजी संपणार आहे. भाऊबीजेदिवशी (२९ ऑक्‍टोबर) बेस्ट समितीच्या बैठकीत सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. या विरोधात प्रशासन न्यायालयात 
गेल्याचे समजते.  

तिजोरीवर ३७ कोटी रुपयांचा भार
सामंजस्य करारावर सह्या करणाऱ्या कामगारांनाच सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असे प्रशासनाचे धोरण आहे; तर सर्व कामगारांना आनुग्रह देण्यात येईल, असे समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे नक्की धोरण काय हे सभेनंतरच स्पष्ट होईल. सानुग्रह अनुदानामुळे बेस्टच्या तिजोरीवर ३७ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात कधी जमा होणार, एवढाच प्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com