कुडूसमध्ये वार्षिक बाजाराची धूम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

वाडा : शंभर वर्षाची जुनी परंपरा असलेल्या कुडूस येथील वार्षिक बाजाराला सुरवात झाली आहे. या बाजारात विकण्यासाठी आलेल्या मालाचे भाव निश्चित करण्यात आले आहेत. ठरलेल्या बाजारभावापेक्षा जास्त दराने माल विकत न घेण्याचे आवाहन कुडूसच्या सरपंच छबी तुंबडा व ग्रामविकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी केले.
वाडा, भिवंडी, शहापूर, विक्रमगड आदी तालुक्यातील शेतकरी पावसाळ्यात लागणाऱ्या वस्तूंची पावसाळ्यापूवीच बेगमी करून ठेवतात. शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तू विकत घेता 

यावा यासाठी हा वार्षिक बाजार भरतो. बाजारात नाशिक, इगतपुरी, घोटी, सिन्नर येथील व्यापारी मसाल्याचे पदार्थ, कांदा, बटाटे, तंबाखू, घोंगडी आदी वस्तू विकण्यासाठी घेऊन येत असतात. 

बाजारात किलोग्रॅमनूसार भाव ठरविण्यात आले आहेत. लाल लसूण 60 तर सफेद लसूण 30 रूपये किलो, मोठा कांदा 9.50, हळद 130, धने 100, राई 60, मेथी 60, जिरे 220, खोबरे 220, ओवा 160, शेपू 120, राजीने 150, चिंच 130 रुपये किलो असे भाव निश्चित करण्यात आले आहेत.

हे भाव पंचकमिटी, ज्येष्ठ ग्रामस्थ, व्यापारी मंडळ, बाजार समिती यांनी निश्चित केले आहेत. येणारा पावसाळा लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी लवकरात लवकर खरेदी करावी असे आवाहन कुडूसचे ज्येष्ठ ग्रामस्थ इरफान सुसे यांनी केले आहे. या भाव निश्चिती बैठकीला गोविंद चौधरी, पांडुरंग चौधरी, स्वप्निल जाधव , ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव, दिलीप चौधरी, प्रितेश पटेल, विष्णू चौधरी, समिर सुसे व व्यापारी बापु गोरे (सिन्नर), रंगनाथ तेलंग, अनिल लहामगे, किरण बोडके, विजय लहामगे, शंकर करपे आदी उपस्थित होते. 

Web Title: annual bazar for trible people