आणखी एका बड्या नेत्याला कोरोनाची लागण, दिलीप वळसे पाटील कोरोना पॉझिटिव्ह

सुमित बागुल
Thursday, 29 October 2020

याआधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

मुंबई : महाराष्ट्रातील आणखी एका बड्या नेत्याला कोरोनाची लागण झालीये. महाराष्ट्र राज्य सरकारमधील कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झालीये. स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. सोबतच त्यांनी संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोणाची चाचणी करून घ्यावी असंही आपल्या ट्विटमध्ये नमूद केलंय. 

स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दिलीप वळसे पाटील आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत असून त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना कुठलाही त्रास होत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. नुकतेच त्यांचे कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती सर्वांना दिलेली आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.

याआधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस डॉक्टरांच्या कोरोनावर सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. 

another big leader dilip walse patil of NCP detected corona positive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: another big leader dilip walse patil of NCP detected corona positive