खालापूरजवळ आणखी एक भीषण अपघात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

खालापूरच्या बोरघाटातील रविवारच्या अपघाताची घटना ताजी असतानाच सोमवारी मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर आडोशी गावच्या हद्दीत एका कारचा भीषण अपघात झाला आहे.

खालापूर - खालापूरच्या बोरघाटातील रविवारच्या अपघाताची घटना ताजी असतानाच सोमवारी (ता.2) मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर आडोशी गावच्या हद्दीत एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा - मोटरमनने ताबा घेताच, लोकल जाऊन धडकली

रणबीर चव्हाण(56) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते नामदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत सचिव पदावर कार्यरत होते. तसेच या अपघातात भगवान कदम आणि दिपक चव्हाण हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील रहिवाशी आहेत. रणबीर चव्हाण, दिपक चव्हाण आणि भगवान कदम हे तिघेही कारने मुंबईकडे जात असताना मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आडोशी गावच्या हद्दीत त्यांच्या कारला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. 

हेही वाचा - धक्कादायक! एसटीच्या तोट्यात आणखी ८०२ कोटींची वाढ

यात रणबीर यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दिपक चव्हाण आणि भगवान कदम यांना जखमी अवस्थेत वाशीच्या एमजीएम रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले. दरम्यान ट्रक चालक महागंङ आणि राजभर पांङे हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्याना निगङी पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 

हसन मुश्रीफांनी घेतले अंत्यदर्शन 

अपघाताची माहिती मिळताच हसन मुश्रीफ यांनी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देवून शवविच्छेदन केंद्रात रणबीर यांच्या मृतदेहाला पुष्पहार अर्पण करत त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी तेथे आलेल्या अपघातग्रस्त पथकाच्या गुरूनाथ साठेलकर यांनी बोरघाट, अंडा पॉईंट येथे वारंवार होत असलेल्या अपघाताबाबत मुश्रीफ यांच्यांशी चर्चा केली. 

web title : Another fatal accident near Khalapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another fatal accident near Khalapur