CET हुकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी

पूजा विचारे
Friday, 23 October 2020

नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षेला मुकावे लागलेल्या विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी परीक्षा देण्याची संधी सीईटी सेलने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला यंदा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाला आहे.  नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षेला मुकावे लागलेल्या विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी परीक्षा देण्याची संधी सीईटी सेलने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाऊन अतिरिक्त सत्रासाठी अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थांना 23 ऑक्टोबर 2020 पर्यंत नोंदणी करता येणार आहे.

कोरोनामुळे लांबणीवर गेलेली परीक्षा सीईटी सेलने 1 ते 9 आणि 12 ते 20 ऑक्टोबर 2020 दरम्यन एमएचटी सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षांदरम्यान झालेली अतिवृष्टी, अचानक खंडित झालेला वीज पुरवठा आणि कोरोनाच्या समस्येमुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांची परीक्षा हुकली. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अधिक वाचा-  'पप्पू' ट्विट कंगनाला पडणार महागात, आणखी एक फौजदारी तक्रार दाखल

पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही ग्रुपच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ज्यांचे हॉलतिकीट आले होते, मात्र परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलकडून अतिरक्त सत्राचे नियोजन करण्यात येणार आहे. परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून, त्यांना अतिरिक्त सत्रासाठी 100 रुपये शुल्क देखील भरावे लागणार आहेत. परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्याचेही सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

--------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Another opportunity for CET students to take the exam


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another opportunity for CET students to take the exam