मुंबईत आजपासून प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

मुंबई - प्लास्टिकला पर्याय म्हणून अनेक व्यापाऱ्यांनी ग्राहकांना पॉलिप्रॉपीलेनच्या पिशव्या देण्यास सुरवात केल्या आहेत; मात्र या पिशव्या प्लास्टीकचाच प्रकार असल्याने मुंबई पालिकेच्या पथकाने या पिशव्या जप्त करून संबंधितांकडून दंड वसुल केला. त्यामुळे हे पथक आणि व्यापाऱ्यांमध्ये खटके उडाले. दरम्यान, सुटीचा दिवस असल्याने पालिकेने रविवारी चेंबूर येथेच कारवाई केली. उद्यापासून शहरभर कारवाई सुरू होणार आहे. 

पोलिप्रॉपीलेनच्या पिशव्या प्लास्टिकचाच प्रकार आहे. त्यात ३० टक्‍क्‍यांहून अधिक प्लास्टिक असते. त्यामुळे चेंबूर येथील काही दुकानांत आढळलेल्या अशा पिशव्या जप्त करून पालिकेच्या पथकाने व्यापाऱ्यांकडून दंड आकारला.

५९२ किलो प्लास्टिक जप्त 
पालिकेच्या पथकांनी रविवारी ५९२ किलो प्लास्टिक जप्त करत संबंधितांकडून तीन लाख ५० हजारांचा दंड वसुल केला.  चेंबूरमध्ये या पथकांना शॉपर्सस्टॉप, मॅकडोनाल्ड, तंदूर रोटी अशा नामांकित दुकानांसह ७२ ठिकाणी बंदी असलेले प्लास्टिक आढळले. दंड भरण्यास नकार देणाऱ्या पाच दुकानदारांविरोधात न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे. तशी नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे.

Web Title: Anti-plastic campaign in Mumbai today