प्लास्टिकविरोधी रथयात्रा सुरू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

मुंबई - राज्य सरकारच्या निर्णयानुसार 28 जूनपर्यंत प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र दिनापासून रथयात्रा सुरू केली आहे. बुधवारी (ता. 2) सकाळी 10 वाजता गेटवे ऑफ इंडियापासून रथयात्रा निघणार आहे. 

राज्य सरकारने प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंवर बंदी आणली आहे. नागरिक आणि लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना 28 जूनपर्यंत त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. नागरिकांकडील प्लास्टिक जमा करण्यासाठी पालिकेने शहरात 25 ठिकाणी कलेक्‍शन बिन बसवले आहेत. त्यापुढे जाऊन पालिकेने प्लास्टिकविरोधात जनजागृती आणि राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आजपासून रथयात्रा सुरू केली आहे. खार मंडईपासून रथयात्रा सुरू झाली, अशी माहिती पालिकेच्या सहायक आयुक्त संगीता हसनाळे यांनी दिली. गुरुवारपासून (ता. 3) रथयात्रा मुंबईतील विविध भागांमध्ये फिरणार आहे. त्यात नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

Web Title: Anti-plastic Rath Yatra