दिग्दर्शक अनुराग कश्‍यप यांना जिवे मारण्याची धमकी! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 जुलै 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील झुंडबळीच्या घटना रोखण्यासाठी विविध क्षेत्रांतील 49 दिग्गज व्यक्तींनी पत्र लिहून चिंता व्यक्त होती. हे पत्र दिग्दर्शक अनुराग कश्‍यप यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताच, एका ट्‌विटर युजरने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील झुंडबळीच्या घटना रोखण्यासाठी विविध क्षेत्रांतील 49 दिग्गज व्यक्तींनी पत्र लिहून चिंता व्यक्त होती. हे पत्र दिग्दर्शक अनुराग कश्‍यप यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताच, एका ट्‌विटर युजरने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी अनुराग कश्‍यप यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र कश्‍यप यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर एका व्यक्तीने, "मी माझी रायफल आणि बंदुकीची सफाई केली आहे, अनुराग आणि मी कधी समोरासमोर भेटतोय याची वाट बघतोय,' असे म्हणत धमकी दिली आहे.

कश्‍यप यांनी तत्काळ हे ट्विट मुंबई पोलिसांना पाठवले. यासंबंधी सायबर पोलिस योग्य ती कारवाई करीत असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anurag Kashyap Receives Death Threats On Twitter