एपीएमसीतील अधिकारी लाचप्रकरणी अटकेत

एपीएमसीतील अधिकारी लाचप्रकरणी अटकेत

नवी मुंबई - एपीएमसी मार्केटमधील किराणा बाजार व दुकाने मंडळाचा सचिव; तसेच सरकारी कामगार अधिकारी मंगेश रामराव झोले (३४) याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ॲन्टी करफ्शन ब्युरो) पथकाने माथाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तब्बल २ लाख रुपयांची लाच घेताना गुरुवारी (ता. ९) सायंकाळी रंगेहाथ पकडले.

या प्रकरणातील तक्रारदाराची माथाडी कामगार संघटना आहे. या संघटनेतील काही माथाडी कामगारांच्या नेमणुकीवरून दुसऱ्या माथाडी कामगार संघटनेने आक्षेप घेऊन त्याविरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयात दाखल असलेल्या या दाव्यामध्ये एपीएमसीच्या फळ मार्केटमधील किराणा बाजार व दुकाने मंडळ अधिकाऱ्याचा अहवाल देणार होता. तसेच कामाच्या ठिकाणी पुन्हा भेट देऊन पुनर्तपासणी अहवाल न्यायालयात सादर करण्याचे; तसेच टोळीचा नेमणूक आदेश रद्द करणार नसल्याचेही तक्रारदाराला आश्वासन  दिले होते.

सात लाखांची मागणी 
न्यायालयात दाखल असलेल्या दाव्यामध्ये तक्रारदाराच्या बाजूने अहवाल देण्यासाठी मंगेश झोले याने सात लाखाची मागणी केली होती; मात्र तडजोडीने सहा लाख रुपये देण्याचे ठरले. त्यातील दोन लाखाचा पहिला हप्ता घेताना झोले याला रंगेहाथ पकडण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com