ॲप रोखणार शालेय मुलांची तस्करी

किशोर कोकणे
गुरुवार, 14 जून 2018

ठाणे - देशभरात लाखो शाळकरी मुलांची तस्करी रोखण्यासाठी ठाण्यातील तरुण स्वप्नील दाभाडे आणि मयूर दाभाडे यांनी ‘३६० ट्रॅक’ नावाचे ॲप आणि सॉफ्टवेअर बनविले आहे. वार्षिक तीन हजार रुपयांहून कमी शुल्क असणाऱ्या शाळांना ‘३६० ट्रॅक’ ॲप आणि सॉफ्टवेअर मोफत देण्यात येणार आहे.

ठाणे - देशभरात लाखो शाळकरी मुलांची तस्करी रोखण्यासाठी ठाण्यातील तरुण स्वप्नील दाभाडे आणि मयूर दाभाडे यांनी ‘३६० ट्रॅक’ नावाचे ॲप आणि सॉफ्टवेअर बनविले आहे. वार्षिक तीन हजार रुपयांहून कमी शुल्क असणाऱ्या शाळांना ‘३६० ट्रॅक’ ॲप आणि सॉफ्टवेअर मोफत देण्यात येणार आहे.

प्रशासनाने मान्यता दिल्यास महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही ॲप बसविले जाईल, असे स्वप्नील यांनी सांगितले. शाळा प्रशासनाने मान्यता दिल्यास विद्यार्थ्यांच्या तस्करीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. आपल्या पाल्याला नव्याने शाळेत घालणाऱ्या पालकांना तो शाळेत व्यवस्थित पोहचला की नाही, याची चिंता सतावत असते. पूर्वी शाळेच्या आवारातूनच मुलांच्या तस्करीचे प्रमाण वाढले होते. त्यावर टिटवाळ्यातील स्वप्नील आणि मयूर दाभाडे यांनी वर्षभरापूर्वी ‘३६० ट्रॅक’ नावाचे ॲप बनविले होते. त्याद्वारे पालकांना आणि शिक्षकांना विद्यार्थ्याच्या शाळेतील हजेरीबाबत माहिती मिळते. शाळेतील उपक्रम, सूचना, सार्वजनिक रजा, विद्यार्थ्याची उपस्थिती आदींचा तपशीलही ॲपच्या माध्यमातून मिळतो. आता गरीब विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि शाळेला डिजिटल रूप येण्यासाठी दोन विद्यार्थ्यांचे वार्षिक शुल्क तीन हजारांपेक्षा कमी आहे अशा शाळांमध्ये सॉफ्टवेअर आणि ॲप मोफत देणार आहेत.

असा होणार वापर
शाळेत ‘३६० ॲप’ बसविल्यानंतर प्रत्येक वर्ग आणि वर्गशिक्षकांचे नाव सॉफ्टवेअरमध्ये असेल. हजेरी घेताना शिक्षकांना फक्त संबंधित मोबाईलवरील ॲप उघडायचे आहे. शिक्षकांना प्रत्येक इयत्ता आणि तुकडी ॲपमध्ये दिसेल. वर्गशिक्षकांनी सिलेक्‍ट केल्यानंतर त्यांना वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण नावे दिसतील.

 

Web Title: app school child smuggling control