सिंधी समाजाचे धर्मांतर रोखण्यासाठी मेणबत्ती ऐवजी दिवा पेटवण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

उल्हासनगर - रुपये आणि आमिषाला बळी पडून काही सिंधी समाजाचे नागरिक ख्रिश्चन धर्मात प्रवेश करत असून ते मंदिरात मेणबत्या पेटवून ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत आहेत. हे धर्मांतर रोखण्यासाठी येणाऱ्या चालिया महापर्वात व उपवासाच्या प्रसंगी मेणबत्यांऐवजी तुपाचा दिवा पेटवण्याचे आवाहन उल्हासनगरात करण्यात येत आहे. त्यासाठी सिंधी जागरूक मंचने पुढाकार घेतला आहे. 

मंचच्या वतीने नगरसेवक मनोज लासी यांनी ही माहिती दिली. ख्रिश्चन धर्मात प्रवेश करण्याचं लोण उल्हासनगरात फोफावले आहे. सुमारे एक हजाराच्या वर सिंधी परिवाराने ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला आहे. या परिवाराची संख्या पन्नास ते साठ हजाराच्या घरात आहे. ख्रिश्चनांचे प्रतिक हे मेणबत्ती आहे. सिंधी समाजांच्या मंदिरात, दरबारात दिवा पेटवला जातो. मात्र धर्मांतर करणारे सिंधी नागरिक हे दिव्या ऐवजी मेणबत्तीचा वापर करून धर्मांतरासाठी प्रवृत्त करत असून किंबहूना उकसवत आहेत.असा आरोप मनोज लासी यांनी केला आहे.

हा प्रकार रोखण्यासाठी सिंधी जागरूक मंचाची स्थापना करण्यात आली आहे. या मंचाच्या वतीने संत भाऊ लिलाराम, सभागृहनेते जमनादास पुरस्वानी, माजी नगरसेवक होशियारसिंग लबाना, सोनू विषणानी, शंकर नागरानी, कपिल ताराचंदानी, प्रकाश तलरेजा यांची बैठक झाली.त्यात 16 जुलै पासून कॅम्प नंबर 1 मधील भाऊ परसराम झुलेलाल मंदिर येथे उपवासाचे महापर्व सुरू होत आहे.तसेच 8 ऑगस्ट पासून कॅम्प नंबर 5 मधील चालिया मंदिरात 40 दिवसांच्या उपवासाचे महापर्व सुरू होत आहे. या महापर्वात सिंधी समाजाने मेणबत्ती टाळून तुपाचा दिवा पेटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तशी जनजागृती बैठका घेऊन केली जात असून त्यास प्रतिसाद मिळणार. असा विश्वास मनोज लासी यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Appeal to light a diya instead of candle to prevent conversion of Sindhi community