ऍपलचा आयफोन लवकरच लालबुंद!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

मुंबई - आयफोन एस 7 आणि आयफोन एस 7 प्लस हे दोन आयफोन ऍपलने काळ्या रंगात आणले. त्यापाठोपाठ आता ऍपल चक्क लाल आयफोन आणण्याच्या तयारीत आहे. ऍपलला 10 वर्षे झाल्याच्या निमित्ताने स्मार्टफोनसाठी हा आकर्षक रंग वापरण्याची संधी मिळणार आहे.

रंगबदलासोबतच हार्डवेअरमध्ये अद्ययावत अशा ए 11 व्हर्जनची चीपसेट लॉंच होण्याची शक्‍यता आहे. ओएलईडी डिस्प्ले, होम बटनचा पर्याय वगळणे, ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आणि ऑल ग्लास केसिंग यासारखे फीचरही नव्या स्मार्टफोनसोबत असण्याची शक्‍यता आहे; पण आयफोन 7 की आयफोन 8 अशा पेचात हे फीचर अडकले आहेत. कंपनीकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ऍपलने ओएलईडी पॅनेलच्या तुटवड्यामुळे ऐनवेळी आयफोन एस 7 साठी एलसीडी पॅनेल बसवले खरे; पण आता आयफोन 8 च्या निमित्ताने ऍपल कोणती नवीन फीचर ग्राहकांना देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: apple iphone in red colour