esakal | रिपब्लिक वाहिनीविरोधात तक्रार घेण्याविषयी अर्ज; मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

रिपब्लिक वाहिनीविरोधात तक्रार घेण्याविषयी अर्ज; मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा आरोप

वृत्तांकन करताना रिपब्लिक वाहिनीने मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार घेण्याविषयी अर्ज केला आहे.

रिपब्लिक वाहिनीविरोधात तक्रार घेण्याविषयी अर्ज; मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा आरोप

sakal_logo
By
रशिद इनामदार

मानखुर्द ः रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी बुधवारी (ता. 4) सकाळी मुंबईतून अटक केली. याविषयीचे वृत्तांकन करताना रिपब्लिक वाहिनीने मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार घेण्याविषयी अर्ज केला आहे. अलिबाग येथील वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी बुधवारी सकाळी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली. या घटनेचे वृत्त प्रसारित करताना मुंबई पोलिसांची बदनामी केली जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचे मनोबल कमी होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी केला आहे. याविषयी तक्रार देण्यासाठी ते ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गेले असता तांत्रिक अडचणीमुळे त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. त्यामुळे ही तक्रार नोंद करून घ्यावी, अशी विनंती करणारा अर्ज पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे. 

हेही वाचा - राज्यात पाच ते सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा! टंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

अर्णब गोस्वामीसह दोघांवर रायगड पोलिसांनी दाखल केले दोषारोप
अलिबाग : अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामीसह स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्‍सचे नितेश सरडा यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात शुक्रवार, (ता.4) रोजी रायगड पोलिसांनी दोषारोप दाखल केले आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा पुर्ण झाला असून आमच्याकडे सबळ पुरावे जमा झालेले असल्याचा दावा रायगड पोलिसांनी केला आहे. 
दरम्यान, आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे वर्ग करावी, अशी मागणी अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात कालच दाखल केली होता. तसेच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही मुंबई उच्च न्यायालयात केली होती. यावरील निर्णयाची प्रतिक्षा न पहाताच रायगड पोलिसांनी दोषारोप दाखल केल्याने या प्रकरणाने पुन्हा एकदा कलाटनी घेतली आहे. 5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग- काविर येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास पुर्ण करीत हे दोषारोप दाखल केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी दिली आहे.

Application to file a complaint against Republic news Channel in mankhurd mumbai

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image