ठाणे सत्र न्यायालयात 4 सरकारी वकिलांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

ठाणे जिल्हा न्यायालयातील सरकारी वकिलांची संख्या आता 14 झाली आहे.

ठाणे ः ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात राज्य सरकारने चार नव्या सरकारी वकिलांची नियुक्ती केली आहे. या चार नव्या नियुक्तीने ठाणे जिल्हा न्यायालयातील सरकारी वकिलांची संख्या आता 14 झाली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारने चार सरकारी वकिलांची नियुक्ती केली. यात ज्येष्ठ वकील संध्या जाधव, शंकर रामटेके, जयश्री इंगळे आणि संगमित्रा अंबोरे यांचा समावेश आहे. ठाणे जिल्हा न्यायालयाकडे यापूर्वी 10 सरकारी वकील कार्यरत आहेत. यात मुख्य सरकारी वकील संजय लोंढे यांचा समावेश आहे.

ठाणे जिल्हा न्यायालयात कार्यरत सरकारी वकील विनीत कुलकर्णी, रेखा हिरवाळे, उज्ज्वला मोहोळकर, विवेक कडू, विजय मुंडे, संजय मोरे, वर्षा चंदने आणि संध्या म्हात्रे, विश्रांती जैन यांचा समावेश आहे. सध्या ठाणे जिल्हा न्यायालयात सरकारी वकिलांची संख्या 14 इतकी आहे; तर वसई आणि पालघर येथील न्यायालयात प्रत्येकी एक असे दोन सरकारी वकील कार्यरत आहेत. तसेच कल्याण न्यायालयात चार सरकारी वकील कार्यरत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of 4 government lawyers in Thane Sessions Court