गणेशपुरी पोलिस स्टेशनमध्ये सहायक पोलिस निरीक्षक परशुराम लोंढे याची नियुक्ती

p.m.londhe
p.m.londhe

वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पदी पी.एम. लोंढे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.

मावळते वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर डोबे यांची काश्मीरा पोलिस स्टेशन येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्तपदी पी.एम. लोंढे यांची नियुक्ती झाली आहे. पी.एम. लोंढे हे सेवाभावी वृत्तीचे आणि शिस्तप्रिय अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी ठाणे येथे आर्थिक गुन्हे शाखा विभाग, कल्याण तालुक्यातील टिटवाळा पोलिस स्टेशन येथे आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. 

दरम्यान, पी.एम. लोंढे यांनी पदभार स्विकारताच गणेशपुरी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे गुन्हेगारांचे कर्दनकाळ, शिस्तप्रिय, अन्यायाला न्याय देणारे म्हणून त्यांची प्रचिती आहे असा पोलीस अधिकारी या पोलिस स्टेशनला मिळाल्याने नागरिकामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस स्टेशनचे कर्मचारी वृन्दानी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com