या जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेला बळकटी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

मुंबईच्या जवळ असूनही रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम होऊ शकलेली नाही. आजही दुर्धर आजारांवरील चांगल्या उपचारांसाठी जिल्ह्यातील रुग्णांना मुंबई अथवा नवी मुंबईतील रुग्णालयांची मदत घ्यावी लागत आहे.

अलिबाग ः ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रायगड जिल्ह्यात 40 सामाजिक आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर) नेमण्यात येणार आहेत. 1 एप्रिलपासूच ते रुजू होणार आहेत. जिल्ह्यासाठी 210 बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी करण्यात आली होती. 

अरे वा : एसटीत राजासारखे आसन 
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने आरोग्यवर्धिनी योजनेतून 40 सामाजिक आरोग्य अधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. गावस्तरावर उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची रचना आहे. जिल्ह्यातील 52 आरोग्य केंद्रे, 255 उपकेंद्रे 9 ग्रामीण रुग्णालये आणि अलिबाग येथे जिल्हा रुग्णालय आहेत. नव्याने नेमण्यात आलेले डॉक्‍टर ग्रामीण भागात कार्यरत राहणार आहेत. 

हे वाचा : भारतीय एकांतात
मुंबईच्या जवळ असूनही रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम होऊ शकलेली नाही. आजही दुर्धर आजारांवरील चांगल्या उपचारांसाठी जिल्ह्यातील रुग्णांना मुंबई अथवा नवी मुंबईतील रुग्णालयांची मदत घ्यावी लागत आहे. योग्य वेळी आणि तातडीचे उपचार न मिळाल्याने रुग्णांचे जीवही धोक्‍यात येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट आणि कार्यक्षम करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. राज्य सरकारच्या आरोग्यवर्धिनी योजनेतून 210 वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी करण्यात आली होती. यातील पहिल्या टप्प्यात 40 वैद्यकीय अधिकारी देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात आणखी 70 अधिकारी मिळण्याची शक्‍यता आहे. शासकीय रुग्णालयांचा पायाभूत विकास या माध्यमातून केला जाणार आहे. त्याचबरोबर रुग्णालयात दर्जेदार उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. 

रायगड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा असतानाही उपचार करणारे डॉक्‍टर नसल्यामुळे आरोग्य सेवेवर ताण पडत होता. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये या अधिकाऱ्यांच्या नेमणुका होणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी येईल. परीक्षा पास होणारे अधिकारी 1 एप्रिलपासून कामावर रुजू होणार आहेत. 
- डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड 
....................... 
रायगड जिल्ह्यतील आरोग्य व्यवस्था 
52 आरोग्य केंद्रे 
255 उपकेंद्रे 
9 ग्रामीण रुग्णालये 
40 रुजू होणारे वैद्यकीय अधिकारी 
210 एकूण मागणी  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointments will be made at the Primary Health Centers and Sub-Centers.

फोटो गॅलरी