कुपोषित बालकाला मदत करणाऱ्या संस्थेला शासकीय रुग्णालयाची शाबासकी

दिनेश गोगी
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

उल्हासनगर : मागच्या वर्षी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका कुपोषित बालकाच्या उपचारासाठी चार हजार रुपये रोख व त्याच्या परिवाराला तीन महिने पुरेल एवढ्या धान्यसाठ्याची मदत करणाऱ्या 'एक हात मदतीचा' या संस्थेला शासकीय रुग्णालयाने शाबासकी देताना त्यांना आभारपत्र दिले आहे.

रुग्णमित्र भरत खरे यांच्या मुकुंद ब्राम्हणे हा बालक कुपोषित असल्याचे समजताच भरत खरे, मनविसेचे उपजिल्हाध्यक्ष व मनसेचे विद्यमान शहराध्यक्ष बंडू देशमुख, मनवीसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी 19 जुलै 2017 रोजी या कुपोषित बालकाला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले होते.

मीडियावर या कुपोषित बालकाची माहिती कळताच एक हात मदतीचा या संस्थेचे सर्वेसर्वा विजय कदम यांनी त्यांच्या टीम सोबत रुग्णालय गाठले आणि मुकुंद ब्राम्हणे याच्या घरची परिस्थिती अगदी गरिबीची हलाखीची असल्याचे समजल्यावर कुपोषित बालकाच्या औषोधो उपचारासाठी चार हजार रुपये रोख व तीन महिन्याचा धान्यसाठा अशा मदतीचा हात दिला होता.

या मदतीची शाबासकी म्हणून आज शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जाफर तडवी याच्या हस्ते 'एक हात मदतीचा' या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विजय कदम यांना रुग्णालयाच्या लेटरपॅडवर विजय कदम यांचे जाहीर आभार मानण्यात आले.  

Web Title: appreciation of government hospital to organisation which helps malnutrition baby