"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'ब्लड टेस्ट' करून घ्या"; एक मिनिट जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य/असत्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

  • कोरोनाबाबत आरोग्य विभागाचा महत्वाचा खुलासा
  • कोरोना रक्त तपासणी महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांची  यादी व्हायरल होत असलेल्या मेसेज बाबत आरोग्य विभागाकडून खुलासा

मुंबई - कोरोनाच्या पार्शवभूमीवर रक्त तपासणी आणि या संदर्भातील महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांची यादी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. अशात खरंच सोशल मीडियावर व्हायरल होणारी ब्लड टेस्ट सेंटरची यादी खरी आहे का? आणि खरंच नॉवेल कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या COVID19 साठी रक्ताची तपासणी करायला लागते का ? हे जाणून घेणं गरजेचं आहे. कोणत्या टेस्टमुळे COVID19 डिटेक्ट होतो ? हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याच मेसेजेसवर आता आरोग्य मंत्रालयाने मोठा खुलासा केलाय. 

COVID2019'हा' रिपोर्ट वाचा आणि कोरोनाबद्दलची भीती मनातून काढून टाका

राज्यात संशयित रुग्णांची कोरोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशाचा द्राव ( 'नसो फैरिंजीयल स्वाब' )घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या 3 ठिकाणी सुविधा असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात. अजून काही दिवसात ही सुविधा केईएम रुग्णालय, मुंबई, हाफकीन यांच्यासह  चार ते पाच ठिकाणी वाढविण्यात येणार आहे.

COVID2019'ती' एक टॅक्सी 'कोरोना' घेऊन फिरत होती मुंबईच्या रस्त्यांवरून...

 

Inside Story - कोरोनाची दहशत आणि पॅरासिटामॉलची गोळी....

त्यामुळे सोशल मीडियावर सध्या  कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून  कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

are we suppose to do blood test for novel corona check what is truth read full story 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: are we suppose to do blood test for novel corona check what is truth read full story