
अर्जुन रामपालच्या मुंबईतील खार मधील घरात छापेमारी केल्यानंतर NCB ला ड्रग्स देखील आढळून आले होते
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिबूडमधील ड्रग्स कनेक्शन्सची प्रकर्षाने चौकशी सुरु झाली. नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या माध्यमातून गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात धाडी सुरु झाल्यात. अनेक अभनेते आणि अभिनेत्र्यांची याप्रकरणी चौकशी देखील झाली.
अशात याप्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल आता गोत्यात येताना पाहायला मिळतोय. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अर्जुन रामपाल आणि ड्रग्स प्रकरणावर बारकाईने चौकशी करत आपलं संपूर्ण लक्ष यावर केंद्रित केलं आहे. स्वतः अर्जुन रामपाल, त्याची गर्लफ्रेंड, गर्लफ्रेंडचा भाऊ आणि आता अर्जुनाची बहीण कोमल हिची देखील चौकशी करण्यात आली आहे.
अभिनेता अर्जुन हा प्रतिबंधित औषधांचे म्हणजेच ड्रग्सचं सेवन करत असल्याचा संशय NCB ला होता. त्यानंतर NCB ने याप्रकरणी चौकशी सुरु केली. काही सूत्रांकडून अर्जुन रामपाल हा ड्रग्सचं सेवन करत होता यावर आता शिकामोर्तब झाल्याचं समजतंय. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समजलेली नाही. मात्र, आता अर्जुन रामपाल हा ड्रग्स डीलिंगमध्येही आहे का, याबाबत NCB तपास करत असल्याचं देखील सूत्रांकडून समजतंय.
महत्त्वाची बातमी : पत्नी आणि दोन मुलांना मागे ठेऊन कैलास यांनी स्टेशन ऑफिसमध्येच स्वतःला संपवलं, मन स्तब्द करणारी घटना
अर्जुन रामपालच्या मुंबईतील खार मधील घरात छापेमारी केल्यानंतर NCB ला ड्रग्स देखील आढळून आले होते. दरम्यान याप्रकरणी अर्जुनची बहीण कोमलची देखील चौकशी केली गेलीये. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB च्या माध्यमातून मुंबईत मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात येतेय. यामाध्यमातून अनेक ड्रग्स डीलर्स आणि पेडलरच्या मुसक्या आवळण्यात NCB ला यश आलं आहे. आजही मुंबईत विविध ठिकाणी NCB तर्फे छापेमारी करण्यात आली.
Maharashtra: Narcotics Control Bureau is conducting raids at three locations in Mumbai in drug cases.
— ANI (@ANI) January 9, 2021
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
arjun rampal NCB trafficking and consuming illegal medicinal product NCB enquiry