
बॉलिवूड अंमली पदार्थ साखळीप्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) शुक्रवारी अभिनेता अर्जुन रामपालची सात तास चौकशी केली.
मुंबई - बॉलिवूड अंमली पदार्थ साखळीप्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) शुक्रवारी अभिनेता अर्जुन रामपालची सात तास चौकशी केली. ड्रग्स वितरण साखळीप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. याप्रकरणी त्याच्या प्रेयसीचीही दोनवेळ चौकशी करण्यात आली आहे. तसेच अर्जुनच्या परदेशी मित्रालाही याप्रकरणी एनसीबीने अटक केली आहे.
हेही वाचा - रस्त्याच्या वादातून सेना-भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; मानपाडा पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल
शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयात दाखल झाला होता. त्याच्या घरात सापडलेल्या प्रतिबंधिक गोळ्यांबाबत ही चौकशी करण्यात आली. अर्जुन रामपाल याची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिची एनसीबीने दोनवेळा चौकशी केली. यावेळी अभिनेता अर्जुन रामपाल यालाही चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. अर्जुन रामपालला शुक्रवारी सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.अर्जुन रामपालच्या घरावर सोमवारी एनसीबी पथकाने छापा टाकला होता.
यापूर्वी अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिचा भाऊ अॅजिसिलाऊस डेमेट्रीअॅडेट्सला एनसीबीने अटक केली होती. लोणावळा येथे डेमेट्रीअॅडेट्स राहत असलेल्या घरावर छापा टाकला. तेथे तो त्याच्या प्रेयसीसोबत राहत होता. त्याच्याकडून 0.8 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर डेमेट्रीअॅडेट्सला खार येथील घराचीही झडती घेण्यात आली. तेथे अलफ्रॅझोलन गोळ्यांची एक स्ट्रीप सापडली होती.
हेही वाचा - हजारो प्राचीन दिव्यांचा अद्वितीय संग्रह! मकरंद करंदीकर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाकडून गौरव
परदेशी मित्राला अटक
अर्जुन रामपालचा मित्र पॉल बार्टेलला एनसीबीने अटक केली आहे. पॉल हा ऑस्ट्रेलियन असून, तो एका मोठ्या बांधकाम कंपनीत काम करतो. तो वास्तू विशारद आहे. त्याचप्रमाणे एनसीबी अधिकाऱ्यांनी अर्जुन रामपाल यांच्या घरी सोमवारी छापा टाकला होता. यावेळी काही टॅबलेट त्या ठिकाणी सापडले होते. या टॅबलेट भारतात विकण्यास बंदी आहे.