मुंबई : महापालिका शाळेतील मुलींसाठी मोफत सॅनेटरी नॅपकिन

Arjun Rampal visit Dagdi Chawl in Mumbai
Arjun Rampal visit Dagdi Chawl in Mumbai

मुंबादेवी : आपल्या देशातील मुली आणि महिलांना रजस्वला काळातील "त्या" दिवसांसाठी उपयुक्त असे सॅनेटरी नॅपकिन 'करा फाउंडेशन' तर्फे 'यूवती'मार्फत उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती महिला शिबिराद्वारे योगिता गवळी यांनी भायखळा येथील दगडी चाळीत पत्रकारांना दिली.

चित्रपट अभिनेता अर्जुन रामपाल आणि ऐश्वर्या राजेश यांच्या साक्षीने उपस्थितीत मुली आणि महिला वर्गाला 'त्या' काळात आता बिनधास्त राहा असा संदेश ही योगिता यांनी दिला. दगडी चाळीत मुंबई महानगर पालिकेच्या आग्रिपाड़ा मनपा स्कूल, माझगाव ताड़वाडी मनपा स्कूल ,उमर रजक स्कूल आणि अन्य 9 शाळांतील मिळून जवळपास 400 ते 500 च्या आसपास मुली उपस्थित होत्या.

करा फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त युवती प्रकल्प निर्माण करण्यात आलेला असून देशातील गरीब गरजू शालेय व महाविद्यालयीन मूली तसेच गृहिणी, नोकरी व्यवसाय करणाऱ्या तरुणी महिलांसाठी प्रत्येक महिन्यातील रजस्वला काळातील "त्या" दिवसांसाठी अत्यंत तनाव रहित कार्य करण्यासाठी सॅनेटरी नॅपकिन पॅड उपलब्ध करण्यात येत आहेत. हे पॅड अत्यंत कोमल आणि पर्यावरणीय असून पातळ आणि अत्यंत कंम्फर्टेबल आहेत.

या वेळी अर्जुन रामपाल यांच्या हस्ते त्यांच्या आगामी डॅडी चित्रपटाचे एका गाण्याचे प्रदर्शन करण्यात आले. त्यांनी मुलींना भेट वस्तु देत शुभेच्छा दिल्या.

आम्ही मुंबई महानगरपालिके तील 9 शाळांतील 440 मुलींना प्राथमिक स्तरावर मासिक ना नफ़ा ना तोटा या तत्वावर हे सेनेटरी नेपकिन पैड उपलब्ध करुन देण्यासाठी नोंदणी केलेली आहे. संपूर्ण देशात आमचे हे प्रॉडक्ट मुलींसाठी अगदी अल्पदरात उपलब्ध करुन दयायचा आमचा मांनस आहे. या सॅनेटरी नॅपकिनच्या निर्मितीसाठी आम्ही 1 यूनिट स्थापन केले असून त्यातील 8 ते 9 महिलांना प्रशिक्षित करुन प्रॉडक्शन तयार होत आहे. महिलांनी महिलांसाठी चालविलेली ही संस्था अल्पावधित आपले उद्दिष्ट गाठेल. मासिक पाळीबद्दल असलेल्या अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुती या विषयांवर आम्ही कार्यशाळा घेत आहोत.
- योगिता गवळी

मला ही संकल्पना फारच भावली. मलाही दोन सुंदर मुली आहेत. स्त्रियां आहेत म्हणूनच आपण जन्मलो मला महिलांबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांना नेहमी महिला म्हणून विविध अडचणीना सामोरे जावे लागते आणि त्या सर्व प्रॉब्लेमवर मात करीत यशस्वी होतात. माझ्या मुलीवर माझे फार प्रेम आहे. मुली महिला आई यांना सन्मान द्या. त्या आपल्या आयुष्याला एक नवी दिशा देत आपले जीवन घडवितात.
- अर्जुन रामपाल

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com