प्रेयसी मारहाणप्रकरणी अरमान कोहलीस अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

मुंबई - प्रेयसीला मारहाण करून पळून गेलेला अभिनेता अरमान कोहली याला मुंबई पोलिसांनी आज लोणावळा येथून अटक केली. त्याला उद्या (ता. 13) मुंबईत आणले जाणार आहे.

मुंबई - प्रेयसीला मारहाण करून पळून गेलेला अभिनेता अरमान कोहली याला मुंबई पोलिसांनी आज लोणावळा येथून अटक केली. त्याला उद्या (ता. 13) मुंबईत आणले जाणार आहे.

दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचा पुत्र असलेल्या अरमानचे सर्व चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर आपटले होते. तीन वर्षांपूर्वी त्याची निरू रंधवा हिच्याशी दुबईतील एका कार्यक्रमात ओळख झाली. तीन वर्षांपासून ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. काही कारणावरून त्या दोघांमध्ये वाद होता. अरमान आणि निरूमध्ये संपत्तीच्या वादातून भांडण झाले. त्या वेळी रागाच्या भरात अरमानने निरूला मारहाण केली. त्यामुळे जखमी झालेल्या निरूवर अंधेरीतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मारहाणप्रकरणी निरूने सांताक्रूझ पोलिस ठाण्यात अरमानविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. तेव्हापासून तो फरारी होता.

Web Title: armaan kohli arrested by girl friend beating crime