एलफिस्टनसह तीन पूल लष्कर उभारणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

एलफिस्टन आणि परळला जोडणासाठी नवा पूल बांधण्यात येणार असून हा पूल लष्कराच्या मदतीने बांधण्यात येणार आहे. याशिवाय करीरोड आणि आंबिवली येथील पूलही लष्कराकडून उभारण्यात येणार आहेत. हे तिन्ही पूल 31 जानेवारी 2018 पर्यंत बांधून पूर्ण होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून देण्यात आले.

मुंबई - एलफिस्टन रेल्वे स्थानकासह अन्य तीन पूल लष्कराकडून 31 जानेवारी 2018 पर्यंत उभारण्यात येतील, असे आश्वासन संरक्षणमंत्री निर्मला सितारामन, रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

एलफिस्टन आणि परळला जोडणासाठी नवा पूल बांधण्यात येणार असून हा पूल लष्कराच्या मदतीने बांधण्यात येणार आहे. याशिवाय करीरोड आणि आंबिवली येथील पूलही लष्कराकडून उभारण्यात येणार आहेत. हे तिन्ही पूल 31 जानेवारी 2018 पर्यंत बांधून पूर्ण होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून देण्यात आले.

एलफिस्टन पुलावरील दुर्घटना घडल्यानंतर तातडीने महाराष्ट्रातून एक शिष्टमंडळ आपल्याला भेटले आणि त्यांनी लष्काराच्या मदतीने इथे नवा पूल बांधता येईल का अशी विनंतीवजा विचारणा केली होती. त्यांच्या सूचनेवर लष्कराच्या अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी तातडीने होकार दिला, असे संरक्षणमंत्री सीतारमन यांनी सांगितले.

एलफिस्टन येथील पुलावर 29 सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला असून, या परिसराचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांनी या ठिकाणी हजेरी लावली.

Web Title: army will built three bridge on mumbai elphinstone railway station