अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर संतापली कंगना, ठाकरे सरकारवर हल्लाबोल

पूजा विचारे
Wednesday, 4 November 2020

गोस्वामी यांना अटक केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत हिनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कंगनानं पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ठाकरे सरकारवर निशाणा साधत आक्षेपार्ह उल्लेख केलेत.

मुंबईः  रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आल्याचं बोललं जात आहे. गोस्वामी यांना अटक केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत हिनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कंगनानं पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ठाकरे सरकारवर निशाणा साधत आक्षेपार्ह उल्लेख केलेत.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कंगनानं म्हटलं आहे की,  तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात? मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे, तुम्ही अर्णब गोस्वामी यांच्या घरात घुसून मारलं आहे, केस ओढले. त्यांना त्रास दिलात,  तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? अजून किती लोकांचे गळे दाबणार आहात? किती आवाज बंद करणार आहात? सोनिया सेना किती आवाज बंद करणार आहे?मात्र हा आवाज वाढत जाणार आहे.

पुढे कंगनानं व्हिडिओमध्ये म्हटलं की,  ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी, अधिकारांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत असे अनेक लोकांचे बळी गेले. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला. एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील.

तुम्हाला कोणी पेंग्विन म्हणाल्यावर राग का येतो.  लोक तुम्हाला पप्पू सेना म्हणतात तेव्हा तुम्हाला राग येतो. पेंग्विनसारखं दिसतात तर म्हणणार ना…तुम्ही पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना..सोनिया सेना म्हटल्यावर राग येतो का…तुम्ही आहात सोनिया सेनेचे लोक. 

संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. महाराष्ट्रात सर्वकाही कायद्यानुसार चालतं. अर्णब गोस्वामी यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचा ठाकरे सरकारशी काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. 

या कारवाईचा कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध आणि सरकारचा संबंध नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं आहे.  मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलिस कधीच कोणावर अन्याय करत नाहीत किंवा सूडाने कारवाई करत नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे.  संजय राऊत यांनी गोस्वामी यांच्यावरील कारवाईचं समर्थन केलं आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक वाचाः  SSR Case: मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी तब्बल दीड लाख फेक अकाऊंट
 

जर कोणी गुन्हा केला असेल आणि तो दडपला असेल आणि त्यासंदर्भातील काही तपासाचे, पुराव्यांचे धागेदोरे हाती आले असतील तर पोलिसांनी कारवाई केली असेल. त्याच्याशी सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा संबंध असण्याचं कारण नसल्याचंही संजय राऊत म्हणालेत.

Arnab Goswami arrested Actress Kangana Ranaut criticizes Thackeray government


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arnab Goswami arrested Actress Kangana Ranaut criticizes Thackeray government