
अर्णब गोस्वामी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अर्णब गोस्वामी यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला; उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच
मुंबई - अर्णब गोस्वामी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान अर्णब यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सुनावणी पूर्ण झाली असून, या जामीन अर्जावर न्यायालयाने निकाल राखुन ठेवला आहे. त्यामुळे अर्णब यांची न्यायालयीन कोठडी कायम राहणार आहे.
हेही वाचा - मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; हार्बर मार्गावर विशेष ट्रेन सुरू राहणार
अर्णब गोस्वामी यांना केलेल्या अटकेबाबत रायगड पोलिसांकडू जेष्ठ विधिज्ञ अमित देसाई हे उच्च न्यायालयात युक्तिवाद करीत आहेत. आपल्याला आपल्या घरून चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आपल्याला केलेली अटक बेकायदेशीर आहे. असा दावा अर्णब गोस्वामीकडून केला जात आहे. त्याल प्रत्युत्तर म्हणून देसाई यांनी अर्णब यांचा दावा खोडून काढला. हेबिबस कॉर्पस या रिट अंतर्गत जामीन मिळावा अशी मागणी अर्णब यांच्याकडून करण्यात आली आहे. परंतु अर्णब यांना जामीन हवा असेल तर त्यांनी, रायगड जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करावी. कारण हे प्रकरण रायगड जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत येते. त्यामुळे कायदेशीर रित्या उच्च न्यायालय या बाबत जामीन देऊ शकत नाही. त्यामुळे आरोपींनी आधी रायगड जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज करायला हवा. अशा आशयाचा युक्तीवाद देसाई यांनी केला आहे.
हेही वाचा - चित्रपटगृहांच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारचे प्राधान्य; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन
अर्णब गोस्वामी यांचे वकील हरिष साळवे यांनी वारंवार अर्णब यांच्या जामीनाची मागणी लावून धरली होती. परंतु न्यायालयाने यावर तत्काळ निर्णय घेता येणार नसल्याचे म्हटले आहे. तरी अलिबाग येथील सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्याचा पर्याय अर्णब यांना सुचवण्यात आला आहे. अलिबाग न्यायालयाने कोणत्याही प्रभावात न येता यावर सुनावणी घ्यावी असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तुर्तास तरी अर्णब गोस्वामी यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
Web Title: Arnab Goswamis Stay Judicial Custody Extended No Relief High Court
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..