आरेतील वृक्षतोडीप्रकरणी वृक्ष प्राधिकरणाकडे दाद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

मुंबई -  आरेत मेट्रो 3 कारशेडप्रकरणी सुरु झालेल्या झाडांच्या कत्तलीबाबत आज (गुरुवारी) भायखळा येथील वृक्ष प्राधिकरणात जनसुनावणी घेण्यात आली. या जनसुनावणीत हजारांहून अधिक पर्यावरणप्रेमींनी सहभाग नोंदवला. आरेतील आदिवासी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधीहीकाही सदस्य या सुनावणीत उपस्थित होते. 

मुंबई -  आरेत मेट्रो 3 कारशेडप्रकरणी सुरु झालेल्या झाडांच्या कत्तलीबाबत आज (गुरुवारी) भायखळा येथील वृक्ष प्राधिकरणात जनसुनावणी घेण्यात आली. या जनसुनावणीत हजारांहून अधिक पर्यावरणप्रेमींनी सहभाग नोंदवला. आरेतील आदिवासी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधीहीकाही सदस्य या सुनावणीत उपस्थित होते. 

या सुनावणीला सर्वांची उपस्थिती न पाहताच वृक्ष प्राधिकरणाने दोन तासांत आटोपते घेतल्याने सेव्ह आरे कॉन्झर्वेशन ग्रुपने आक्षेप नोंदवला आहे. ही सुनावणी पुन्हा घेतली जावी, अशी मागणी उपस्थितांनी यांनी केली. अनेकांना कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे मुख्य प्रवेशद्वारावरच ताटकळत उभे राहावे लागले. या सर्व सदस्यांच्या उपस्थितीतच सुनावणी घेतली जावी, अशी मागणी करण्यात आली. आम्हांला आजच वृक्षतोडीबाबत निर्णय हवा, या घोषणांनीच सभागृह दणाणून गेले. आरेचे पर्यावरणातील महत्त्व, येथील वन्यजीवांचा सहवास पाहता आरेतील कोणताही प्रकल्प नको, अशी मागणी आदिवासी प्रकाश भोईर यांनी मांडली. आदिवासींसाठी आरेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे कारशेडप्रकरणी होणारी वृक्षतोड थांबवली जावी, असा मुद्दाही त्यांनी मांडला. यावेळी आरे कॉन्झर्वेशन ग्रुपचे सदस्य झोरु बाथेना यांनीही एमएमआरसीएलच्या चुकीच्या धोरणांविषयीही वृक्ष प्राधिकरणात माहिती दिली. दोन हजारांहून अधिक झाडे कापली गेल्यास आरेचा मोठा हरितपट्टा गमावला जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. आरेतील मेट्रो कारशेडप्रकरणी प्राथमिक पातळीवर केवळ 103 झाडे कापण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाने मंजूर केला आहे. परंतु एमएमआरसीएलने कापलेल्या अतिरिक्त वृक्ष कत्तलींची चौकशी केली जाईल, असे वृक्ष प्राधिकरणाच्यावतीने सांगण्यात आले. या सुनावणीतील हरकतीच्या मुद्‌द्‌यांवर एमएमआरसीएलकडून स्पष्टीकरण मागितले जाईल, त्यांचे स्पष्टीकरण योग्य नसल्यास आम्ही भूमिका मांडू, अशी माहिती वृक्ष प्राधिकरणाचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. 

सुनावणीतील हरकतीचे मुद्दे - 
- एमएमआरसीच्या दाव्यानुसार आदिवासी प्रजापूर या आरे मेट्रो कारशेड परिसरात राहत नाही 
- मेट्रो कारशेड हा बिबट्याचा अधिवास आहे. 
- न्यायालयात आरेतील बांधकामांबाबत खटले आहेत 
- आरेतील मेट्रोकारशेडला इतर सात ठिकाणांचे पर्याय असताना आरेचा हट्ट कशाला 
- आरे हे जंगल असल्याने वृक्ष कत्तलीसाठी वनविभागाचीही परवानगी आवश्‍यक

Web Title: Array Metro 3 Carshade Case