भिडेंच्या अटकेसाठी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

अहमदनगर येथील गणेश पवार हा तरुण आज दुपारी 1 च्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आला. अचानक संभाजी भिडेंच्या निषेधार्थ घोषणा देत या युवकाने अंगावर केरोसिन ओतून घेतले. हा प्रकार पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या पालिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले.

मुंबई : भीमा कोरेगाव दंगलीत आरोप दाखल असलेले मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांना सरकार अटक करत नसल्याच्या निषेधार्थ आज मंत्रालयासमोर एका युवकाने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी या युवकास तत्काळ ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. गणेश पवार असे या तरुणाचे नाव आहे. 

अहमदनगर येथील गणेश पवार हा तरुण आज दुपारी 1 च्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आला. अचानक संभाजी भिडेंच्या निषेधार्थ घोषणा देत या युवकाने अंगावर केरोसिन ओतून घेतले. हा प्रकार पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या पालिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. गणेश पवार हा रिपब्लिकन सेना या संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले.

भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी आरोप असलेल्या संभाजी भिडे यांना अजूनही अटक होत नाही. भिडे यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी त्याने मागणी केली. नगर जिल्ह्यातील राहुरी येथील तो रहिवासी आहे.  

 
 

Web Title: For Arrest to Bhide One Attempt to suicide