उल्हासनगरात 7 गावठी पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या तरुणावर झडप

दिनेश गोगी
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

उल्हासनगर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पाश्वभूमीवर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तब्बल 7 गावठी पिस्तुलांची तस्करी करण्यासाठी आलेल्या तरुणावर गुरुवारच्या रात्री झडप घातली आहे. त्याच्याकडून 7 गावठी पिस्तुलां सोबत 6 जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.

कॉलेजकुमारांची बॅग पाठीवर असलेला एक तरुण संशयास्पदरीत्या शहाड ब्रिजच्या खाली येरझारा मारत असल्याची खबर मिळताच, गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशरुद्दीन शेख,युवराज सालगुडे,श्रीकृष्ण नावले,उपनिरीक्षक गणेश तोरगल, पोलीस पथक संजय माळी, भरत नवले, राम मिसाळ, विश्वास माने, संजय पाटील, विजय पाटील, विठ्ठल पदमेरे, नवनाथ वाघमारे यांनी शहाड गाठून सापळा लावला. तरुणाच्या हालचालीवर वॉच ठेवला. कुणाची तरी प्रतिक्षा करत असलेल्या या तरुणावर अखेर पोलिसांनी झडप घातली.आणि धक्कादायक अशा तब्बल 7 गावठी पिस्तुल आणि 6 जिवंत काडतूसे त्याच्या बॅगमध्ये मिळून आली.

गावठी पिस्तुलांची तस्करी करण्यासाठी आलेल्या या 23 वर्षीय तरुणाचे नाव अनुजकुमार जैस्वाल असून तो कळवा झोपडपट्टी मध्ये राहणारा आहे.तो रेकॉर्ड वरील गुन्हेगार मार्च मध्ये तो ऑर्थर जेल मधून सुटला आहे. जेलमध्येच त्याची आणखीन एका रेकॉर्डवरच्या राजू नावाच्या गुंडा सोबत ओळख झाल्यावर जैस्वाल आणि राजू हे उत्तरप्रदेशातील जौनपूर मध्ये गेले.त्यांनी गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूसे विकत घेतली.गोदान एक्सप्रेसने कल्याणला उतरून शहाड स्टेशन गाठले.राजू काहितरी कामानिमित्त बाहेर गेला.जैस्वाल कडे मोबाईल नाही.त्यामुळे बॅगेत गावठी पिस्तुल असल्याने जैस्वाल हा अस्वस्थेत राजूच्या प्रतिक्षेत येरझारा मारत असतानाच पोलिसांच्या सापळ्यात अडकला.

फरार झालेला हा राजू कोण? - राजूने आणि जैस्वालने ह्या गावठी पिस्तुली जौनपूर मधून कुणाकडून किती रुपयांना विकत घेतल्या?या पिस्तुलांची तस्करी कुणाला करण्यात येणार होती?या सवालांचा उलगडा चौकशीत केला जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी सांगितले.
 
Web Title: arrest a boy who smuggled 7 pistols in Ulhasanagar