गावठी बॉम्बच्या साठ्यासह अलिबागच्या तरुणाला अटक

किरण घरत
सोमवार, 26 मार्च 2018

कळवा : मुंब्रा शीळफाटा येथे गावठी बॉम्ब विक्रीसाठी येणाऱ्या मोरारपाडा अलिबाग येथील तरुणाला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता. 25) सायंकाळी सापळा लावून अटक केली व त्याच्या कडून 2 लाख 32 हजार किंमतीचा 290 गावठी बॉम्बचा साठा जप्त केला आहे.

मोरारपाडा, रेवस अलिबाग येथील प्रवीण अर्जुन पाटील (वय 34) हा रविवारी सायंकाळी मुंब्रा शीळफाटा येथे गावठी बॉम्ब विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा घटक 1 चे सहा. पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना मिळाली होती. त्या नुसार पोलीस आयुक्त परमवीर सिंग व गुन्हे शाखा 1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शीळफाटा परिसरात या पथकाने सापळा रचून प्रवीण पाटील याला अटक केली. त्याच्याकडे असलेल्या कापडी पिशवीत असलेले गावठी बॉम्ब खरे आसल्याची खात्री करण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानुसार हे खरे आसल्याची खात्री झाली सदर हे गावठी बॉम्ब जंगलात रान डुकराची शिकार करण्यासाठी वापरीत आसल्याची माहिती आरोपीने दिली.

पोलिसांनी प्रवीण कडून 2 लाख 32 हजार किंमतीचे 290 गावठी बॉम्ब हस्तगत केले. ही यशस्वी कामगिरी सहा. पोलीस निरीक्षक संदीप बागुल, हवालदार आबतलीक शेख, शिवाजी गायकवाड, सुनील माने, संभाजी मोरे, भगवान हिवरे या ठाणे गुन्हे शाखा 1 च्या पथकाने केली.

Web Title: arrest one person with crude bomb stock