रिक्षाचालक सव्वातीन लाखाच्या गांजासह अटक 

दिनेश गोगी
बुधवार, 9 मे 2018

न मोठ्या प्रवाशी बॅगमध्ये तब्बल सव्वातीन लाख रुपये किमतीचा गांजाचा साठा विक्रीसाठी बाळगणाऱ्या उल्हासनगरातील एका रिक्षाचालकाला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. 21 किलोच्या वर गांजा त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

उल्हासनगर - दोन मोठ्या प्रवाशी बॅगमध्ये तब्बल सव्वातीन लाख रुपये किमतीचा गांजाचा साठा विक्रीसाठी बाळगणाऱ्या उल्हासनगरातील एका रिक्षाचालकाला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. 21 किलोच्या वर गांजा त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी ही माहिती दिली.

कॅम्प नंबर 4 सुभाष टेकडी परिसरात राहणाऱ्या गणेश शेट्टी नावाच्या रिक्षाचालकाकडे गांजाचा साठा असल्याची माहिती मिळताच, वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सालगुडे, अशरुद्दीन शेख, श्रीकृष्ण नावले, उपनिरीक्षक गणेश तोरगल, उदय पालांडे, आर.टी.चव्हाण, एस.के.पवार, रमजू सौदागर, महाशब्दे, माळी, जी.के.जंगम, जगदीश कुलकर्णी, जावेद मुलानी, एन.एन.वाघमारे, डी.बी.भोसले यांनी गणेश शेट्टी याच्या घरावर छापा मारला. 

घराची झडती घेतली असता, दोन मोठ्या प्रवाशी बॅगमध्ये अंदाजे 21 किलोच्या वर सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा गांजा आढळून आला. टेकडी परिसरात गांजा विकण्यासाठी ठेवण्यात आला होता, अशी कबुलीही शेट्टी याने दिली आहे. 14 मे पर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.ज्यापद्धतीने उल्हासनगरमध्ये गांजा जप्त करण्यात येत आहे. त्यावरून शहरातील तरुणांना नशेच्या विळख्यात खेचण्याचं षडयंत्र रचले जात आहे काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Web Title: Arrested rickshaw driver with Hemp in ulhasnagar