बलात्काराची धमकी देणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

मुंबई - राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याच्या मुलीबाबत अपशब्द वापरून तिच्यावर बलात्कार करू, अशी धमकी देणाऱ्याला अखेर गोरेगाव पोलिसांनी गुजरातहून अटक केली. गिरीश महेश्‍वरी असे त्याचे नाव आहे. 

मुंबई - राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याच्या मुलीबाबत अपशब्द वापरून तिच्यावर बलात्कार करू, अशी धमकी देणाऱ्याला अखेर गोरेगाव पोलिसांनी गुजरातहून अटक केली. गिरीश महेश्‍वरी असे त्याचे नाव आहे. 

गुरुवारी (ता. ५) गिरीशला दिंडोशीतील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तक्रारदार एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर गिरीश १६०५ युजर्सने एक अश्‍लील संदेश पाठवला होता. संदेशात अपशब्दासह मुलीवर बलात्कार करू, अशी धमकी दिली होती. धमकीनंतर महिलेने ट्विटरद्वारे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत गोरेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी गुजरातचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला अटक करून बुधवारी (ता. ४) मुंबईत आणले. गिरीशची पोलिस चौकशी करत आहेत. त्याने धमकीचा संदेश का पाठवला हे स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Arrested a threat of rape