डोंबिवली - दोन खंडणीखोरांना अटक

संजीत वायंगणकर
शुक्रवार, 11 मे 2018

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील एका बिल्डरला पाच कोटीच्या खंडणीसाठी धमकी देणाऱ्या दोघा खंडणीखोरांना अटक करण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण शाखेला यश आले आहे. भगवान विशे उर्फ देवा पाटील (रा. शहापूर) आणि फिरोज शेख (रा. गोरेगांव) अशी अटक केलेल्या आरोपींची नांवे असून या दोघांना शनिवारी कल्याण कोर्टात हजार करण्यात येत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

पश्चिम डोंबिवलीच्या नवापाडा येथील गणेशनगर मध्ये प्रदीप जोशी (वय 52) हे बिल्डर राहतात. 20 एप्रिलला संध्याकाळच्या सुमारास त्यांना फोन आला. हा फोन करणाऱ्याने तुझ्या घरात लग्नकार्य आहे ते चांगले पार पडावे असे वाटत असेल तर पाच करोड रुपये दे नाहीतर तुला ठार मारून टाकण्यात येईल अशी धमकी दिली. या धमकीमुळे जोशी हे भयभीत झाले. काय करावे हे त्यांना  सुचत नव्हते .ही बाब बरेच दिवस लपवून ठेवली परंतू धीर करुन शेवटी गुरुवारी त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र या गुन्हाची गंभीर दखल घेऊन गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी तातडीने पावले उचलत खंडणी खोरांना पकडण्यासाठी फौसदार पी. जी. ठाकूर, एन.एच. मुगदुन यांच्यासह नरेश जोगमार्गे, विलास मालशेटे, राजकुमार तरडे, निकुळे या पथकावर कामगिरी सोपविली. या पथकाने सापळा रचून  कल्याण-शिळ मार्गावरील लोढा हेवन परिसरातून या दोघांना अटक केली. या दोघांनी बिल्डर प्रदीप जोशी यांना खंडणीसाठी धमकाविल्याची कबुली दिल्याचे व यांचा संबंध कुणाशी आहे का याचा तपास सुरु असल्याचे वपोनि संजू जॉन यांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: arrested two Ransomer in dombivali