धक्कादायक! शाळकरी मुलींची होत होती देहविक्री! एक दलाल महिला अटकेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने देहविक्रीच्या व्यवसायात ढकलत असल्याच्या प्रयत्नावरून एका महिलेला आणि तिच्या साथीदाराला गोरेगावातून अटक करण्यात आली आहे.

अंधेरी : अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने देहविक्रीच्या व्यवसायात ढकलत असल्याच्या प्रयत्नावरून एका महिलेला आणि तिच्या साथीदाराला गोरेगावातून अटक करण्यात आली आहे.

कोरोना तपासणीसाठी मुंबईत आणखी दोन प्रयोगशाळा!

मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट- 12 च्या पथकाने 14 मार्च रोजी सापळा रचून 53 वर्षीय आरोपीला आणि 25 वर्षीय महिलेला अटक करून शाळकरी मुलीची त्यांच्या तावडीतून सुटका केली. 

कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस?

शाळकरी मुलीला फूस लावून वेश्‍याव्यवसायात ढकलण्यात येत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट- 12 चे पोलिस निरीक्षक सचिन गवस यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने बोगस ग्राहक पाठवून खात्री केली. बोगस ग्राहक दलालांना भेटला असता 30 हजार रुपये द्यावे लागतील, असे त्याने त्याला सांगितले. दलालाने त्याला एका शाळकरी मुलीचे छायाचित्र आणि शाळेचे ओळखपत्र पाठवले. त्यानुसार पोलिस पथकाने ओबेरॉय मॉलच्या समोर जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावर सापळा रचला. शाळकरी मुलीसह विरारमधील दोन दलालांना अटक केली. त्यांच्याविरोधात दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
Arresting brokers who prostitute girls


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arresting brokers who prostitute girls in andheri