Sweet Potato
Sweet Potato

आषाढीनिमित्त रताळ्याची आवक वाढली

वाशी : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर रताळ्याची आवक वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने त्याचा परिणाम आवकेवर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, कर्नाटक येथील बेळगाव, तसेच म्हैसूर येथून रताळ्याची आवक होत आहे. 

या वर्षी दुष्काळामुळे रताळ्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे बाजारातील आवक ही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली. रताळी वर्षभर बाजारात येत असतात. दररोज 2 ते 3 गाड्यांची आवक होत असते; मात्र आषाढी एकादशीनिमित्त रताळ्याची आवक वाढली असून, बाजारात 10 ते 15 गाड्यांची आवक मागील तीन दिवसांपासून येत आहे. आवक कमी असल्याने रताळ्याच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात रताळ्याला 10 ते 16 रुपये किलोपर्यंत दर असतो; मात्र आषाढी एकादशी निमित्ताने त्याचे दर वाढले असून 16 ते 24 रुपये किलो झाले आहेत. किरकोळ बाजारात रताळ्याला 40 ते 45 रुपये प्रतिकिलोचा दर मिळत जात आहे.

आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर दरात वाढ झाली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत तेच दर आहेत, असे व्यापारी शंकर पिंगळे यांनी सांगितले. तर कर्नाटक बेळगाव येथून येणारी रताळी ही चवीला गोड असून, ती पौष्टिक आहेत. रताळ्याचे गावरान आणि सटाणा असे दोन प्रकार असतात. सध्या गावरान रताळ्याची बाजारात आवक झाली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com