महानगर गँस कंपनीकडून माणकीवली ग्रामपंचायतीत आरो वॉटर फिल्टरेशन प्लांट.

गँस कंपनीकडून माणकीवली ग्रामपंचायतीत आरो वॉटर फिल्टरेशन प्लांट.
Mumbai
MumbaiSakal

खोपोली : नागरिकांना शुद्ध पाणी (Water) उपलब्ध व्हावे यासाठी मानकीवली गावाच्या सरपंच चंदन भारती (Chandan Bharti), उपसरपंच विकास रसाळ (Vikas Rasal) व सदस्यांनी वेळोवेळी महानगर गँस (Gas) कंपनीच्या व्यवस्थापनाशी केलेल्या पाठपुराव्याला यश आले.

Mumbai
सावधान : मध्यमवर्गीय महिलांना टार्गेट करत फायनान्स कंपनीने शंभर महिलांना घातली टोपी 

कंपनीने सीएसआर फंडातून पेयजल योजने अंतर्गत गावासाठी आरो फिल्टरेशन प्लांट बसवून दिला.या प्लांटचे उद्घाटन गुरुवारी दि.19 रोजी संपन्न झाले . या योजनेच्या माध्यमातून माणकीवली ग्रामपंचायतीमधील नागरिकांना 30 पैसे प्रति लिटर या माफक दरात शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे.

याप्रसंगी शिवसेना समन्वयक एकनाथ पिंगळे, उपतालुकाप्रमुख संजय देशमुख, सल्लागार शशिकांत देशमुख, कर्जत युवासेना उपतालुकाप्रमुख प्रसाद थोरवे, महानगर कंपनीचे प्रोजेक्ट मँनेजर शरविन फ्रँसिस, पिरमल कंपनीचे प्रोजेक्ट मँनेजर दिपक कळमकर, सरपंच चंदन भारती, उपसरपंच विकास रसाळ, सदस्य अजय भारती, सदस्य अर्चना पिंगळे, युवानेते रोहीत विचारे, सामाजिक कार्यकर्ते अशोक पिंगळे, भानुदास रसाळ यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com