esakal | गणेशमुर्तींसाठी मुंबईत फिरते विसर्जन तलाव... पालिकेसह भाजप युवा मोर्चाचाही पुढाकार; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशमुर्तींसाठी मुंबईत फिरते विसर्जन तलाव... पालिकेसह भाजप युवा मोर्चाचाही पुढाकार; वाचा सविस्तर

गणेश मुर्ती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेच्या विभागांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. आता वांद्रे आणि अंधेरी परिसरांत फिरत्या ट्रकवर कृत्रिम तलावाची संकल्पना राबवली जाणार आहे. या ट्रकला सजवण्यात येणार आहे. 

गणेशमुर्तींसाठी मुंबईत फिरते विसर्जन तलाव... पालिकेसह भाजप युवा मोर्चाचाही पुढाकार; वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गणेश मुर्ती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेच्या विभागांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. आता वांद्रे आणि अंधेरी परिसरांत फिरत्या ट्रकवर कृत्रिम तलावाची संकल्पना राबवली जाणार आहे. या ट्रकला सजवण्यात येणार आहे. 

गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी २ हजार ऑनलाइन नोंदणी, मात्र असेल 'ही' अट

मराठमोळ्या मातीचा मोठा उत्साहाचा सण असलेल्या गणेशोत्सवाला काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सव साजरा करण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याच सूचना विसर्जनाच्या बाबतीतही कऱण्यात आल्या आहेत. यावर्षी पालिकेने घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी एका वेळी पाच सदस्यांनी विसर्जनस्थळी एकत्र येऊ नये, तसेच विसर्जनस्थळी आरती करू नये. अशा सूचना दिल्या आहेत. यामध्ये विसर्जन करण्यासाठी आणखी नवे सुरक्षित संकल्पना वांद्रे आणि अंधेरी सारख्या विभागातून पुढे आल्या आहेत. या परिसरांमध्ये कृत्रिम तलावांसोबतच मालवाहू ट्रकला सजवून त्यावर फिरत्या तलावाची रचना करण्यात येणार आहे. या विभागांमध्ये विशिष्ट ठिकाणी ट्रक थांबवण्यात येणार आहे. एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपूते यांनी ही माहिती दिली आहे. हे ट्रक गणेशमूर्तींनी पुर्ण भरले की, विसर्जनस्थळी नेऊ गणेशमुर्ती विसर्जित केल्या जातील असेही ते म्हटले. गणेश मंडळे आणि घरघुती गणेशभक्तांकडून ऑनलाईनपद्धतीने ते किती दिवससांचा गणपती तसेच कुठे विसर्जन करणार या बाबतची माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्यामुळे विसर्जनाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.

अत्यंत महत्त्वाचं : यंदा थेट विसर्जनासाठी जाता येणार नाही, विसर्जनासाठीची नियमावली वाचून घ्या

भाजप युवा मोर्चातर्फे मुंबईत 35 फिरते तलाव

महापालिका यासंबधीचे नियोजन करित असताना गणेशभक्तांसाठी भाजप युवा मोर्चाही पुढे सरसावला आहे. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे 'विसर्जन आपल्या दारी' या योजनेनुसार ट्रकवरील फिरते कृत्रिम तलाव विविध वसाहतींमध्ये फिरवले जाणार आहेत.  मुंबईभर असे 36 कृत्रिम तलाव फिरवले जातील. भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्या कल्पनेतून हा उपक्रम होत आहे.  नागरिकांनी आपापल्या बाप्पांचे विसर्जन या फिरत्या तलावात करावे असे आवाहन मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

यापूर्वी फिरते उपहारगृह, फिरते वीजबिल भरणा केंद्र, फिरती बँक असलेल्या मुंबईत असा फिरत्या तलावाचा उपक्रम प्रथमच राबविला जातो आहे. या उपक्रमांतर्गत एका मोठ्या ट्रकवर कृत्रिम तलाव तयार करून हा फिरता तलाव नागरिकांच्या घरासमोर श्रीगणेश विसर्जनासाठी नेण्यात येणार आहे. मध्यवर्ती ठिकाणी हा ट्रक उभा केला जाईल. या फिरत्या तलावासोबत उत्तरपूजा सांगण्यासाठी पुरोहित देखील असतील. तसेच विसर्जनासाठी मदत करणारे कर्मचारीही सोबत असतील. त्यामुळे नागरिकांना या तलावात उतरण्याचाही त्रास घ्यावा लागणार नाही, असे तिवाना यांनी 'सकाळ' ला सांगितले. 

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top