कलाकार, खेळाडूंना भारतरत्न कशाला?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्यांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी खर्च केले; ते खरे भारतरत्न आहेत. बाबा आमटे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यायला हवा. कलाकार आणि खेळाडूंना भारतरत्न कशाला, असा परखड सवाल अभिनेते नाना पाटेकर यांनी बॉम्बे आर्ट सोसायटीच्या 125 व्या वर्षानिमित्त भरवण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी गुरुवारी विचारला. कलाकारांसाठी "दादासाहेब फाळके‘ पुरस्कार आहे. खेळाडूंसाठी "खेलरत्न‘ पुरस्कार आहे. कलाकार आणि खेळाडू केलेल्या कामाचा मोबदला घेत असतात; त्यात देशासाठी केलेले काम काय असते, असेही मत त्यांनी मांडले.

प्रदर्शनाच्या निमित्ताने ज्येष्ठ चित्रकार व सोसायटीचे अध्यक्ष वासुदेव कामत यांनी नाना पाटेकर यांचे लाईव्ह पोर्ट्रेट रेखाटले. एकीकडे नानांची शाब्दिक फटकेबाजी आणि दुसरीकडे तन्मयतेने कॅनव्हासवर मारले जाणारे रंगांचे फटकारे यांची जुगलबंदी रंगली होती. अवघ्या अर्ध्या तासात चित्र तयार झाल्यानंतर "लाईट शेडमध्ये असलं तरीही माझा तुसडेपणा आणि तिरसटपणा चित्रात नेमका उतरला आहे‘, असे नाना पाटेकर मिश्‍कीलपणे म्हणाले. माझ्या हातात अशी जादू असती, तर इथेच रेंगाळलो असतो. मात्र, मग जगाचा एवढा मोठा कॅनव्हास अनुभवता आला नसता. पूर्वी जी गोष्ट व्यवसाय होणार होती, ती आता छंद बनली आणि छंद असलेले नाटक व्यवसाय बनले. आयुष्यात कधी तरी बाबूराव पेंटर यांचे रंगीबेरंगी आयुष्य मोठ्या पडद्यावर साकारायला आवडेल, असेही ते म्हणाले.

"जेजे‘तील आठवणी
जे. जे. कला महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देताना पाटेकर म्हणाले की, आम्ही "जेजे‘चे आऊटस्टॅडिंग विद्यार्थी होतो; मात्र दामू केंकरे आणि हणमंते सर नसते, तर आजचा पल्ला गाठताच आला नसता. वर्षाला 90 रुपये पॉकेटमनी होता, तोही स्वत: कमावलेला. सबमिशन, कॅंटीनमधील गप्पा आदी अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

Web Title: Artists, players should award?